शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘डे-केअर’ वॉर्ड सुरू होणार

By admin | Updated: February 10, 2017 02:44 IST

रक्ताचा आजार समजल्या जाणाऱ्या सिकलसेल, थॅलेसिमियाच्या अनेक रुग्णांवर रक्त बदलण्याची वेळ येते.

मेडिकल : सिकलसेल, थॅलेसिमियासह इतरही रुग्णांवर उपचारनागपूर : रक्ताचा आजार समजल्या जाणाऱ्या सिकलसेल, थॅलेसिमियाच्या अनेक रुग्णांवर रक्त बदलण्याची वेळ येते. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. याशिवाय इतरही आजाराच्या रुग्णांना केवळ दिवसभर उपचार करून परत पाठविणे शक्य असते. मात्र, मेडिकलमध्ये रुग्णांची अफाट गर्दी पाहता हे शक्य होत नव्हते. आता अशा रुग्णांसाठी खास विशेष-डे केअर वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. या वॉर्डाचे काम पूर्ण झाले असून येत्या मंगळवारपासून हा नवा वॉर्ड रुग्णसेवेत असेल. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय प्रशासनाने उचलले हे पाऊल रुग्णाना दिलसा देणारे आहे. गरिबांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रोज सुमारे अडीच हजारावर रुग्ण येतात. यातील सुमारे दोनशेवर रुग्णांना रुग्णालयात भरती केले जातात. यातील काही रुग्णांवर एक दिवसाच्या उपचाराची गरज असते. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही तातडीने उपचार मिळून रुग्णालयातून सुटी मिळण्याची अपेक्षा असते. दुसरीकडे, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे दूरू न उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांना अडचणीचे जाते. विशेषत: सिकलसेल किंवा थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्त देऊन त्याच दिवशी सुटी देणे शक्य आहे. अशाच प्रकारच्या इतरही आजाराच्या रुग्णांचे आहे. परंतु रुग्णांच्या गर्दीमुळे हे शक्य होत नव्हते. याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतली. त्यांनी अशा रुग्णांसाठी ‘डे-केअर’ वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला.(प्रतिनिधी) ‘डे-केअर’वॉर्डाचा लाभ सर्वच रुग्णांसाठी‘डे-केअर’ वॉर्डमध्ये सिकलसेल, थॅलेसिमियासोबतच इतरही आजाराचे रुग्ण ठेवले जातील. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हा वॉर्ड सुरू असेल. जसजसे रुग्णांवर उपचार झाले त्यांना घरी पाठविण्यात येईल. दिवसभर उपचार करूनही ज्यांनी आणखी उपचाराची गरज आहे, अशा रुग्णांना संबंधित विभागाच्या वॉर्डात पाठविले जाईल. या रुग्णाच्या सेवेत त्या-त्या विभागाचे वरिष्ठ डॉक्टरांसोबतच निवासी डॉक्टर असणार आहेत. वरिष्ठ डॉक्टरांना त्यांच्या जागेवर रुग्ण दिसेल अशी सीसीटीव्हीची व्यवस्था केली जाईल.-डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल