शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद पाकिस्तानात नाहीच तर देणार कुठून?

By admin | Updated: June 5, 2016 02:51 IST

भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही.

पाक उच्चायुक्त अब्दुल बासित : शांती युद्धाने नव्हे तर चर्चेने शक्यनागपूर : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. जी व्यक्ती पाकिस्तानातच नाही, त्या व्यक्तीला भारताच्या स्वाधीन करणे किंवा न करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक पत्रकार भवन येथे शनिवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. बासित यांनी सांगितले, पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावे, असाच आपला मुख्य प्रयत्न राहील. याबाबत आपण आशावादी आहोत. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानात ‘कंट्री व्हिजा’ देण्याबाबतची अपेक्षा व्यक्त करीत दोन्ही देशांमध्ये शांतता ही युद्धामुळे येणार नसून ती सार्थक चर्चेनंतरच शक्य आहे. भारत जेव्हा योग्य समजेल तेव्हा चर्चेचे सत्र पुढे चालू शकेल. परंतु यात कुठलीही अट किंवा लिंकेजेस असू नयेत. येणाऱ्या पिढीला सुद्धा हेच हवे आहे की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध चांगले असावे. याला सार्थक करण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) क्रिकेट डिप्लोमसीने प्रश्न सुटणार नाही क्रिकेट डिप्लोमसीचे स्वत:चे एक वेगळे महत्त्व आहे. परंतु त्याच्या काही मर्यादाही आहेत. क्रिकेटमुळे दोन्ही देशातील प्रश्न सुटू शकणार नाही. यामुळे वातावरण चांगले होऊ शकते, परंतु ते फार काळ टिकून राहू शकत नाही. दहशतवादामुळे सर्वाधिक त्रास पाकिस्तानलाच सोसावा लागला आहे. आम्ही मागील ३५ वर्षांपासून दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागील दोन वर्षात यशही मिळाले आहे. परंतु अजूनही खूप करायचे आहे. नागरिकही आता दहशतवादाच्या विरोधात उभे होत आहेत. अशा परिस्थितीत हळूहळू दहशतवाद मिटविण्यास यश मिळणे निश्चित आहे, असेही ते म्हणाले. हल्ल्याच्या वक्तव्यावर चर्चेची गरज नाहीरावळपिंडी येथून मिसाईलने दिल्लीवर पाच मिनिटात हल्ला करता येऊ शकतो, पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान यांनी केलेल्या या वक्तव्यसंदर्भात पाक उच्चायुक्त बासित म्हणाले, डॉ. अब्दुल कादीर हे कुठल्याही शासकीय पदावर नाही. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिक चर्चा करण्याची गरज नाही.