शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलाचा मुलीने केला खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:07 IST

वानाडोंगरी : बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलाचा १७ वर्षीय मुलीने लाकडी दांड्याने तोंडावर वार करून खून केला. हिंगणा तालुक्यातील सावळी ...

वानाडोंगरी : बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलाचा १७ वर्षीय मुलीने लाकडी दांड्याने तोंडावर वार करून खून केला. हिंगणा तालुक्यातील सावळी बीबी येथे सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (६०) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरची पहिली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर त्याने १५ वर्षांपूर्वी वंदना या महिलेशी विवाह केला होता. त्यावेळी वंदनासुद्धा विवाहित होती. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. काही दिवस सावळी या गावात ज्ञानेश्वर व वंदना एकत्रित राहिल्यानंतर तो खापरी ता. सेलू (जि. वर्धा) येथे राहायला गेला होता. अधूनमधून तो सावळी येथे वंदनाकडे यायचा. इथे आल्यानंतर तो पत्नी वंदना व सावत्र मुलीला नेहमी त्रास द्यायचा. सोमवारीही सकाळी ११ वाजता तो सावळी येथे दारू पिऊन आला. सावत्र मुलीशी बळजबरी करून त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. पत्नीलासुद्धा ऐकत नव्हता. मुलीला हे सहन न झाल्याने भांडण झाले. यात मुलीने लाकडी दांडा उचलून ज्ञानेश्वरच्या तोंडावर मारला. घाव बसताच तो घराच्या अंगणातच खाली पडला. रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारिन दुर्गे, सहायक पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर, जीवन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे, पोलीस कर्मचारी विनोद कांबळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यासोबत मृताची पत्नी वंदना व १७ वर्षीय विधिसंघर्ष मुलीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर अपर पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, परिमंंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक मसाळ यांनीही घटनास्थळी दाखल होत खुनाची माहिती जाणून घेतली.

ज्ञानेश्वरला चार वर्षाचा झाला होता तुरुंगवास

मृत ज्ञानेश्वर गडकर याने २०१६ मध्ये अल्पवयीन सावत्र मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात त्याच्यावर ३७६ व पोक्सोनुसार गुन्हा दाखल होऊन त्याला १५ जानेवारी २०२१ ला चार वर्षांचा तुरुंगवास झाला होता. मात्र तो जानेवारी महिन्यातच शिक्षा संपण्यापूर्वी परतला होता. तेव्हापासूनच त्याने या मायलेकींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याबद्दल वंदना हिने २० जानेवारी २०२१ ला हिंगणा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर विरुद्ध तक्रारही दाखल केली होती.