शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी महोत्सव १० नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:29 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय मजदूर संघ, किसान संघ व स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला येत्या १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देमोहन भागवत, सुमित्रा महाजन करणार उद्घाटन : चित्रप्रदर्शन व माहितीपटाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय मजदूर संघ, किसान संघ व स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला येत्या १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्टन होणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री विरजेश उपाध्याय यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीतर्फे घेण्यात येणार हा महोत्सव वर्षभर चालणार आहे. रविवारी डॉ. हेडगेवार स्मारक भवन, रेशीमबाग येथे दुपारी ३ वाजता महोत्सवाचे रीतसर उद्घाटन होणार असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. तत्पूर्वी दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे चित्र प्रदर्शन आणि साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शिवाय त्यांच्यावर तयार केलेल्या माहितीपटाचेही लोकार्पण केले जाणार आहे. समारोह समितीचे सदस्य, संघाचे पदाधिकारी, आयोजक संघटनांचे केंद्रीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी, शेतमजूर, कामगार व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भामस, भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंचच्या संयुक्त विद्यमाने यानंतर वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून नवी दिल्ली येथे महोत्सवाचा समारोप होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी, स्वदेशी जागरण मंचचे प्रकाश सोवनी, सुधाकर कुळकर्णी आदी उपस्थित होते.अर्थव्यवस्थेची रचनाच चुकीचीदेशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली अवकळा सरकारमुळे नाही तर रचनेमुळेच आली असल्याची टीका विरजेश उपाध्याय यांनी केली. अर्थव्यवस्थेचे संकट अचानक किंवा कोणत्या सरकारमुळे आलेले नाही. स्वातंत्र्यानंतर स्वीकारण्यात आलेले अर्थव्यवस्थेचे धोरणच चुकीचे होते. ही व्यवस्था कार्पोरेट क्षेत्राला केंद्रीत ठेवून कार्य करणारी आहे. ती देशहिताची नाही. त्यामुळे चढ उतार होउन आजची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगात अर्थव्यवस्था कामगार व सामान्य माणूस केंद्रीत असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेला बँकांच्या राष्ट्रियीकरणाचा निर्णयही चुकीचा असल्याचे उपाध्याय म्हणाले. ते बँकांचे राष्ट्रियीकरण नाही तर सरकारीकरण होते, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतSumitra Mahajanसुमित्रा महाजन