शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉलिटेक्निक’साठी ‘तारीख पे तारीख’

By admin | Updated: July 1, 2017 02:25 IST

मागील वर्षीप्रमाणे पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साहच दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांचा निरुत्साह : प्रवेशाचे अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षीप्रमाणे पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साहच दिसून येत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत उपलब्ध जागांच्या केवळ १९ टक्केच अर्ज आल्याने अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज दाखल करण्याची तारीख ४ जुलैपर्यंत वाढवली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्यावर्षीदेखील अशाच पद्धतीने मुदत वाढविण्यात आली होती. परंतु तरीदेखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या होत्या. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मूळ परिपत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० जून ही होती. परंतु विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात निरुत्साह दिसून आला आहे. नागपूर विभागात एकूण २४५९५ जागा आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ४८३८ अर्जच आले आहेत व याची टक्केवारी काढली असता ती अवघी १९.६७ टक्के इतकीच आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने जागा कशा भरावा असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर उभा राहिला आहे. मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक राहण्याचा धोका असल्याने महाविद्यालय प्रशासनावर मोठा दबाव आला आहे. आता चार दिवसांची वाढीव मदत मिळाली असली तरी या कालावधीत फार अर्ज मिळण्याची शक्यता असल्याने थोडासा दिलासा मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र सध्याची एकूण स्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार असेच अंदाज लावले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठीच वाढवली मुदत यंदा अपेक्षित प्रमाणात अर्ज आलेले नाही. काही विद्यार्थ्यांना निरनिराळ्या कारणांमुळे अर्ज दाखल करता आलेले नाही. त्यामुळे ही मुदत वाढवली असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली आहे.