शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘प्रेम के ढाई अक्षर’

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

कॅन्सर हा सर्वत्र फोफावणारा एक दुर्धर रोग आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्टीने काळजीत टाकणारा हा आजार आहे.

मैना फाऊंडेशनचे आयोजन : कनक सूर मंदिरचे सादरीकरणनागपूर : कॅन्सर हा सर्वत्र फोफावणारा एक दुर्धर रोग आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्टीने काळजीत टाकणारा हा आजार आहे. कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत योग्य पद्धतीने झाले नाही तर त्यातून बाहेर पडणे पीडितांसाठी कठिण आव्हान होते. स्तन कॅन्सरने ग्रासलेल्या आणि आर्थिक दृष्टीने दुर्बल महिलांना उपचारासाठी मदत करण्यासाठी २००८ सालापासून कार्यरत असणाऱ्या मैना फाऊंडेशनतर्फे एका संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘प्रेम के ढाई अक्षर’ हा गीतांचा कार्यक्रम कनक सूर मंदिरतर्फे सादर करण्यात आला. साई सभागृह, शंकरनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे संचालक व ज्येष्ठ गायक डॉ. दत्ता हरकरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात डॉ. दत्ता हरकरे, कनका गडकरी, नीलेश दामले, अनुजा केदार, साक्षात कट्यारमल या गायकांनी तयारीने गीत सादर करून उपस्थितांची दाद घेतली. कार्यक्रमाला डॉ. गिरीश गांधी, माजी महापौर कुंदाताई विजयकर, आ. सुनील केदार, मैना फाऊंडेशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक शंकर बळवंत ऊर्फ राजाभाऊ पंडित, अलका व विनय श्रीखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते राजाभाऊ पंडित लिखित ‘आॅन ह्युमन बिहेवियर’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तक विक्रीतून येणाऱ्या निधीचा उपयोग विदर्भातील स्तन कॅन्सरग्रस्त महिलांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे. याप्रसंगी राजाभाऊ पंडित यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. इंडियन कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या अतिशय महाग उपचारांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. विदर्भात मैना फाऊंडेशन जे कार्य करीत आहे, ते अतिशय महत्त्वाचे असून आपले शक्य तेवढे सहकार्य आपण फाऊंडेशनला करू, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी. खा. दत्ता मेघे प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर मानवी जीवनातील प्रेमाच्या विविध भावना अधोरेखांकित करणारा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘इक शहनशाह बनवाके हसी ताजमहल, चांद सिफारीश है करता हमारी, हमने देखी है इन आँखो की..., बेताब दिल की.., मेरे दिल ने जो मांगा, ये जिंदगी उसी की है.., यारा हो यारा’ आदी अनेक गीतांनी हा कार्यक्रम रंगतदार झाला. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर तर साथसंगत गडीकर, दहासहस्र, टांकसाळे, जोशी, दीपक कांबळे, पसेरकर यांनी केली. (प्रतिनिधी)