शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

मेयोतून कोरोनाची लागण होण्याचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 01:16 IST

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसंशयित रुग्णांना पाठविले जाते ओपीडीत : काही रुग्णांवर रांगेत लागण्याचीही येते वेळ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कोरोना विषाणू संशयित रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था नाही. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.मेयोमध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ‘हेल्प डेक्स’ असलातरी तो वॉर्ड क्र. १५ समोर व आकस्मिक कक्षासमोर आहे. मात्र ओपीडी कक्षात या संदर्भात माहिती देणारे किंवा ‘हेल्प डेक्स’ नाही. यामुळे बाधित देशाची पार्श्वभूमी असलेल्या किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना थेट ‘ओपीडी’ गाठावे लागते. यात प्रथम त्याला नोंदणी कार्डच्या रांगेत नंतर मेडिसीनच्या कक्षाकडे जावे लागते. येथील डॉक्टरच भरतीचे केसपेपर तयार करून वॉर्ड क्र. २४ मध्ये दाखल करतात. मेयोमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्णांसह ६६ संशयित रुग्ण आतापर्यंत दाखल झाले. यातील अनेकांना या प्रक्रियेतून जावे लागले आहे.नोंदणी कार्डसाठी रांगेत लागावे लागतेएका संशयित रुग्णाने ‘लोकमत’ला सांगितले की, एका बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व सर्दी, खोकला व ताप आदी लक्षणे आढळून आल्यावर मेयोत दाखल होण्यासाठी येथील एका जबाबदार डॉक्टरला फोन करून माहिती दिली. परंतु मेयोत आल्यावर त्यांनी ‘ओपीडी’त पाठविले. नोंदणी कार्ड काढण्यासाठी रांगेत लागावे लागले. तिथून मेडिसीन कक्षात पाठविले. तिथे प्रवासाचा इतिहास घेतल्यानंतर वॉर्ड क्र. २४ मध्ये भरती होण्यास सांगितले. सायंकाळी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविण्यात आले. परंतु या दरम्यान नाईलाजेने ५०वर रुग्णांचा जवळून संपर्क झाला. हे धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)corona virusकोरोना वायरस बातम्या