शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी व मुलीची जबाबदारी नाकारणाऱ्या अभियंत्यास दणका

By admin | Updated: September 22, 2015 04:20 IST

पत्नी व मुलीची देखभाल करण्याची जबाबदारी असतानाही त्यांना मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या सागरी अभियंत्यास

नागपूर : पत्नी व मुलीची देखभाल करण्याची जबाबदारी असतानाही त्यांना मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या सागरी अभियंत्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. या अभियंत्याचा पोटगीविरुद्धचा अर्ज फेटाळतानाच त्याच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला आहे.पती कबीर, पत्नी कविता व मुलगी काव्या (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी आहेत. २१ नोव्हेंबर २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने कविताला २००० तर, काव्याला १००० रुपये महिना पोटगी देण्याचे निर्देश दिले होते; तसेच २००० रुपये दावा खर्चही देण्यास सांगितले होते. या आदेशाविरुद्ध कबीरने उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता हा अर्ज फेटाळून कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. तसेच कविता व काव्याला पुन्हा न्यायालयात ओढल्यामुळे कबीरवर २५ हजार रुपये दावा खर्च बसविला आहे. कविताच्या माहितीनुसार, कबीरने २०१३ पासून पोटगी दिलेली नाही. कबीरचे वेतन १ लाख १० हजार रुपये आहे. कबीरने वेतनाचा मुद्दा फेटाळला होता. पण त्याने अन्य उत्पनाचा कोणताही पुरावा सादर केला नाही. यामुळे कविताचे म्हणणे स्वीकारण्यात आले. (प्रतिनिधी)सासरी क्रूरतापूर्ण वागणूक४कविताला सासरी क्रूरतापूर्ण वागणूक मिळत होती. तिला कार खरेदी करण्यासाठी पैसे मागण्यात येत होते. पैसे न दिल्यामुळे तिचा छळ करण्यात येत होता. डिसेंबर-२०१० मध्ये काव्याचा जन्म झाला. मुलगी झाल्यामुळे कबीरने रुग्णालयाचे बिल दिले नाही. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर कबीर कविताला घेण्यासाठी गेला नाही. यामुळे ती माहेरी राहायला गेली. काही दिवसांनी कविताचे वडील कबीरला समजवायला गेले. यानंतर कबीरने कविताला घरी नेले; पण त्याच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. शेवटी कविताने पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार नोंदविली, तसेच पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती.