शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएनडीएल’ला दणका

By admin | Updated: September 21, 2015 02:56 IST

स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळेच १६ मुक्या जनावरांचे जीव गेल्याचे ...

नागपूर : स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळेच १६ मुक्या जनावरांचे जीव गेल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे जरीपटका पोलिसांनी एसएनडीएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र, कोणते अधिकारी आणि कोणते कर्मचारी या घटनेला जबाबदार आहेत, ते स्पष्ट झाले नसल्याने वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती. जुना जरीपटक्यातील सी.एम.पी.डी.आय. मार्गावर राहणारे सागर सुखराम यादव (वय ५८) यांचा गाई म्हशी पाळण्याचा व्यवसाय आहे. दुधदुभते करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराजवळच गोठा (गाई-म्हशी बांधण्याची जागा) असून, गोठ्यावरून इलेक्ट्रीक लाईन गेली आहे. ती नेहमीच स्पार्क होत असल्याने जनावरांच्या अंगावर ठिणग्या पडत होत्या. यादव यांनी धोकादायक प्रकाराची तक्रार एसएनडीएलचे लघुवेतन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे केली होती. दोन आठवड्यात वेळोवेळी तक्रार करूनही अधिकारीच व कर्मचाऱ्यांनीही त्याची दखल घेतली नाही. अशातच १७ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता विजेची लाईन तुटून मुक्या जनावरांवर पडली. त्यामुळे सहा म्हशी, चार म्हशींची पिल्लं, चार गाई, दोन वासरं अशी एकूण १६ जनावर ठार झाली. या घटनेमुळे एसएनडीएल प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा जनमानसात तीव्र रोष झाला. परिणामी जरीपटका पोलिसांनी यादव यांची तक्रार नोंदवून घेत प्रकरण चौकशीस ठेवले. (प्रतिनिधी)सेटलमेंटचे प्रयत्न फसलेया दुर्घटनेमुळे यादव यांचे ८ लाख, ४० हजारांचे नुकसान झाले. त्यामुळे एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी यादव यांच्याशी सेटलमेंट करून हे प्रकरण थांबविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न फसले. पोलिसांच्या चौकशीत एसएनडीएल प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा उघड झाला. यादव यांनी दोन आठवड्यांपूर्वी तक्रार करून धोक्याची सूचना देऊनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे मुक्या जनावरांचे बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याचे लक्षात घेत जरीपटका पोलिसांनी एसएनडीएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दरम्यान, कोणते अधिकारी आणि कोणते कर्मचारी या घटनेला जबाबदार आहेत, त्याची पीएसआय किन्नाके चौकशी करीत आहेत.