शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावित्र्याच्या अनुभूतीसह नृत्याची ध मा ल

By admin | Updated: December 3, 2015 03:30 IST

राज्यात सर्वत्र प्राथमिक दांडिया स्पर्धा घेण्यात आली. यातून निवडण्यात आलेल्या चमूंना उपांत्य फेरीत संधी देण्यात आली....

राज्यात सर्वत्र प्राथमिक दांडिया स्पर्धा घेण्यात आली. यातून निवडण्यात आलेल्या चमूंना उपांत्य फेरीत संधी देण्यात आली. उत्कृष्ट ठरलेल्या गोवा, अहमदनगर, गडचिरोली आणि नागपूरच्या चमूला अंतिम फेरीत स्थान मिळाले. चारही संघाने आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चमू म्हणून नागपूरच्या ग्रुपने बाजी मारली. गडचिरोली चमूचा दुसरा क्रमांक तर गोवाच्या चमूने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेला प्रारंभ करण्यापूर्वी सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम आणि स्टार प्रवाहच्या ‘दुर्वा’ मालिकेची नायिका ऋता दुरगुले यांच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढून नृत्य सादरीकरण करणाऱ्या चमूचा क्रम निश्चित करण्यात आला. गोव्याच्या संघाने प्रथम सादरीकरण केले. ‘ऐ ढोलो मारो ढोल बुजो रे...’ गीतावर या संघाने केलेले सादरीकरण उपस्थितांची दाद घेणारे होते. या संघान द्रौपदी वस्त्रहरण, शेषनाग आदी दृष्य साकारून नृत्य सादर केले. रंगीबेरंगी पोशाख आणि गीतांवर ताल धरीत कलावंतांनी सादर केलेल नृत्य भाव खाणारे होते. नृत्याच्या शेवटी ‘रिस्पेक्ट वूमन’ हा संदेशही दिला. अहमदनगर चमूने, महादेव जप करण्यात तल्लीन झाल्यामुळे पार्वतीने रक्तबीज राक्षसाचा संहार करण्याचा ठरविले. तिने त्याचा संहार केला पण त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राक्षस निर्माण झाले. त्यामुळे क्रोधीत होऊन पार्वतीने महाकालीचे रूप धारण केले. पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी महादेव रणात येतात आणि पार्वतीचा क्रोध शांत करतात. असा प्रसंग सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गडचिरोली संघाने ‘बेटी बचाव’ हा संदेश देत नृत्याविष्कारातून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. नागपूरच्या संघाने नारी महत्त्वाची आहे. आपल्या संस्कृतीत नारीची पूजा करण्यात येते आणि ज्या ठिकाणी नारीला सन्मान दिला जातो तिथेच सुखसमृद्धी नांदते अशा आशयाचे नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. या स्पर्धेत नागपूरच्या चमूला ५१ हजार रुपये व ट्रॉफी प्रदान करून विजयी घोषित करण्यात आले. ३१ हजाररुपयांच्या पारितोषिकासह गडचिरोलीच्या चमूने द्वितीय स्थान तर २१ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक गोवाच्या चमूने पटकाविले. या अंतिम स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध लोकगीत गायक अरविंद वेगडा, अभिनेत्री ऋता दुरगुले, कोरिओग्राफर राजेश सेदानी आणि कत्थक नृत्यांगना किरण भेले यांनी केले.