शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार

By admin | Updated: December 9, 2015 03:20 IST

ते जेव्हा सुरू व्हायचे तेव्हा होतील. नागपुरात आणि आजूबाजूच्या भागात मात्र अनेक वर्षांपासून चोरी छुप्या मार्गाने अनेक डान्सबार सुरू आहेत.

‘मदिरा’तील छमछमचा आवाज गृह मंत्रालयातनागपूर : ते जेव्हा सुरू व्हायचे तेव्हा होतील. नागपुरात आणि आजूबाजूच्या भागात मात्र अनेक वर्षांपासून चोरी छुप्या मार्गाने अनेक डान्सबार सुरू आहेत. ग्राहकांकडून नोटांची उधळण होत असल्यामुळे मध्यरात्री सीसीटीव्ही बंद करून बारमालक बारबालांना बिनधास्त नाचवतात. लोकमतने अनेकदा हे ठळकपणे प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसापर्यंत हे बंद व्हायचे. पुन्हा छमछम सुरू व्हायची. रविवारी अशाच प्रकारे सेंट्रल एव्हेन्यूवरील मदिरा बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याची ‘सचित्र’ माहिती मिळाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी बारमालक नीरज गुप्ता, व्यवस्थापक श्रीकांत गायकवाड, उमेश तिवारी तसेच हरिदास मेश्राम या चौघांना अटक केली. तीन बारबालांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात नेले. या तिघीही अनेक दिवसांपासून मुंबईत बस्तान मांडून असून त्यातील एक मुंबईची, दुसरी (लुधियाना) पंजाब तर तिसरी मूळची नेपाळची आहे. मात्र, ती मुंबईतच स्थायिक झाली असून, विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रकमेचा करार करून त्या वेगवेगळ्या शहरात ‘परफॉर्मन्स’साठी पोहचतात. बारमालकाने दलालाच्या माध्यमातून मुंबई आणि नेपाळच्या बारबालेला प्रत्येकी ७५ हजार तर पंजाबमधील तरुणीला १ लाख रुपये महिना करारावर येथे आणले होते. गायन आणि नृत्य करण्यासोबत अनेक बारबाला नंतर देहविक्रयही करतात. त्यातही बारमालकाचे कमिशन असते. पुढच्या दोन आठवड्यात ठिकठिकाणची आंबटशौकिन मंडळी नागपुरात येणार हे लक्षात घेत मोठ्या प्रमाणात बारबालांना येथे बोलावून घेण्यात आले होते. मात्र, एका सजग नागरिकाने डान्सबारची क्लिपिंग तयार केली आणि लेखी तक्रारीसह ती मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांना पाठविली. ही क्लिपिंग व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून व्हायरल केली. लोकमतने डान्सबारचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. गृह मंत्रालयातही ‘छमछम’चा आवाज पोहचला. त्यानंतर राज्यमंत्री राम शिंदे यांनी २४ तासात या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)