शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

नृत्याची रंगत, रणवीरची धमाल अन साधनाचा 'सरगम'

By admin | Updated: December 3, 2015 12:04 IST

प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहने'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मल्हार या गीतावर केलेल्या मल्हारी नृत्यामुळे आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगतदार ठरली.

 

लोकमत सखी मंच: आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी

नागपूर : प्रसिद्ध सिनेअभिनेता रणवीर सिंह याने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मल्हार या गीतावर केलेले मल्हारी नृत्य..सुप्रसिद्ध पार्श्‍वगायिका साधना सरगम यांच्या सुरेल गीतांची रंगलेली मैफील.. गुजरातचे लोकगीत गायक अरविंद वेगडा यांनी गीतातून भरलेला जोश, दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक.. प्रचंड उत्साहाचे वातावरण..त्यात स्टार प्रवाह वाहिनीवरील 'दुर्वा' मालिकेची नायिका ऋता दुरगुले यांनी प्रेक्षकांशी साधलेला संवाद..उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून जाणारा आसमंत..अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर मदहोष करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वार्‍यासह अंगावर झेपावणारी थंडी. सारेच वातावरण उत्सुकता आणि उत्कंठेत बुडालेले. अशा वातावरणात लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगतदार ठरली.  लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह, सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, स्टार प्रवाहच्या 'दुर्वा' मालिकेची नायिका ऋता दुरगुले, सुप्रसिद्ध लोकगीत गायक व पार्श्‍वगायक अरविंद वेगडा, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.  कार्यक्रमाचा प्रारंभ साधना सरगम यांच्या सुरेल गीतांनी झाली. तिने लोकप्रिय असलेले गीत 'निले निले अंबर पे..' सादर केले आणि उपस्थितांनी या सादरीकरणाला दाद देत कार्यक्रमात रंग भरला. याप्रसंगी तिने 'पहला नशा.., चक दे चक दे.., हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी मे..' आदी अनेक गीतांनी समा बांधला. पण रसिकांनी तिला मराठी गीत सादर करण्याची विनंती केली आणि प्रेक्षकांच्या विनंतीला मान देत साधना सरगमनेही मराठी गीतांचे सादरीकरण करून रसिकाना जिंकले. याप्रसंगी तिने 'जांभुळ पिकल्या झाडाखाली..' हे गीत सादर करून स्टेडियम डोक्यावर घेतले. यानंतर 'रेशमाच्या रेघांनी..' ही लावणी सादर केली. सुप्रसिद्ध पार्श्‍वगायक आणि लोकगीत गायक अरविंद वेगळा यांनी खास गुजराती गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. तर नायिका ऋता दुरगुले हिने रसिकांच्या मनाचा ठाव घेत संवाद साधला.  हा सगळाच आनंद अनुभविताना प्रेक्षक धमाल दांडियाच्या अंतिम फेरीसाठीही उत्सुक झाले होते. अंतिम फेरीला अतिथींच्या हस्ते ईश्‍वरचिठ्ठी काढून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी एकच जल्लोष करीत दांडियाच्या चमूंना प्रोत्साहित केले.  सर्वप्रथम गोव्याच्या चमूने दांडियाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर अहमदनगर, गडचिरोली आणि अखेर नागपूरच्या चमूने कलात्मकतेने दांडिया नृत्य सादर करून ही स्पर्धा अधिक उंचावर नेली. स्पर्धा सुरू असताना अभिनेता रणवीर सिंहने ढोल-ताशांच्या आणि तुतारीच्या निनादात रंगमंचावर प्रवेश केला. तो आला..नाचला..गायिला आणि त्याने प्रेक्षकांना जिंकले. नमस्कार..कसे काय नागपूर? असा मराठी संवाद साधला. त्याला नागपूरकरांनीही 'बरे आहे नागपूर' असा प्रतिसाद देत त्याचे स्वागत केले. यावेळी त्याने 'हर हर महादेव'चा जयघोष आणि बाजीराव मस्तानी चित्रपटातील संवाद सादर करून त्याने मल्हारी नृत्य सादर करून दाद घेतली. दरम्यान लोकमत सखी मंचच्या ओळखपत्राचे लोकार्पण अतिथींच्या हस्ते करण्यात आले. 51000 रुपयाचे प्रथम पारितोषिक नागपूरच्या चमूने पटकाविले. ३१ हजार रुपयाचे द्वितीय पारितोषिक गडचिरोलीच्या चमूने मिळविले तर २१ हजार रुपयाचे तृतीय पारितोषिक गोव्याच्या चमूला प्रदान करण्यात आले. या महाअंतिम फेरीचे परीक्षण अरविंद वेगडा, ऋता दुरगुले व प्रसिद्ध कोरिओग्राफर राजेश सेदानी आणि कत्थक विशारद किरण भेले यांनी केले. लोकमत सखी मंचच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी नागपुरातील चिटणीस पार्क, महाल येथे आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहने प्रेक्षकांच्या आग्रहास्तव 'बाजीराव मस्तानी' सिनेमातील 'मल्हारी..' या शौर्य गीतावर तुफान नृत्य केले. त्याच्या या नृत्याला उपस्थित रसिकांनी मनमोकळी दाद दिली. याप्रसंगी रणवीर सिंहला भेटण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी चिटणीस पार्क भरगच्च फुलले होते.