शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

दलित, मुस्लिम व्यक्तीला सरसंघचालक करावे

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

शोषणमुक्त व समरसता असलेला भारत हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात.

बी.जी. कोळसे पाटील : ‘देशप्रेम व देशद्रोहाचे सिद्धांत’ यावर परिसंवादनागपूर : शोषणमुक्त व समरसता असलेला भारत हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात. जर त्यांना खरेच असे वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व एखाद्या दलित किंवा मुस्लिम व्यक्तीला सरसंघचालकपदी बसवावे, असे मत ‘आरएसएसमुक्त भारत अभियान’चे प्रवर्तक माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. देश बचाओ आघाडीतर्फे ‘देशप्रेम आणि देशद्रोहाचे सिद्धांत’ या विषयावर परिसंवादाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.धनवटे नॅशनल कॉलेज येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित या परिसंवादाला दिल्ली विद्यापीठातील प्रा.अपूर्वानंद तसेच राजकीय चळवळीत सक्रिय असलेल्या कविता कृष्णन, देश बचाओ आघाडीचे संयोजक विरा साथीदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील सद्यस्थितीच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती घातक आहे. समाजाचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षणप्रणालीवरदेखील आघात सुरू आहे. अशा स्थितीत सर्व विचारवंतांनी एकत्रित याचा विरोध करण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. विचारांचा सामना विचारांनी होत नाही. धर्मांध विचारांच्या विरोधात आपण कामच करत नाहीत. विचारवंतदेखील जीवाच्या भीतीमुळे लाचार झालेले दिसतात. परंतु मी मात्र लढत राहणार, असे प्रतिपादन बी.जी.कोळसे पाटील यांनी केले.कुठलाही वादग्रस्त मुद्दा असला तरी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे. कोणावर आपले म्हणणे लादणे योग्य नाहीच. परंतु कमीतकमी समोरच्याचे मत ऐकून घेण्याची तयारी असली पाहिजे. विचारांच्या बदल्यात जर हिंसेने उत्तर मिळणार असेल तर ही अराजकतेची सुरुवात आहे, असे मानले पाहिजे, असे वक्तव्य प्रा.अपूर्वानंद यांनी केले.देशभक्ती व देशप्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देशप्रेम मनातून यावे लागते तर देशभक्ती काही वेळा लादल्या दाते. देशात सध्या देशभक्तीवर भर दिला जात आहे. परंतु समजून व विचार करून देशप्रेम करण्याची गरज असल्याचे कविता कृष्णन म्हणाल्या. वीरा साथीदार यांनी यावेळी परिसंवादाची प्रस्तावना मांडत संचालनदेखील केले.(प्रतिनिधी)