शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

दाजीबा गर्ल वैशाली सामंतने जिंकले

By admin | Updated: October 19, 2015 02:40 IST

हिंदी - मराठी गीतांच्या पार्श्वगायन क्षेत्रातील मराठमोळी जादुई स्वरांची गायिका म्हणजे वैशाली सामंत. भन्नाट मस्तीभऱ्या गीतांसह, ...

लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजननागपूर : हिंदी - मराठी गीतांच्या पार्श्वगायन क्षेत्रातील मराठमोळी जादुई स्वरांची गायिका म्हणजे वैशाली सामंत. भन्नाट मस्तीभऱ्या गीतांसह, गंभीर खोलवर जाणारी गीतेही सारख्याच ताकदीने सादर करणारी ही गायिका. तरुणाईची आवडती गायिका असणाऱ्या वैशाली सामंतच्या गीतांचा कार्यक्रम रविवारी लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल प्रांगणात आयोजित करण्यात आला. आपल्या लाडक्या गायिकेला समोर पाहून प्रेक्षकांनीही तिला दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला. लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मूळ नागपूरचे महागायक अनिरुद्ध जोशी आणि रसिका जोशी यांचाही सहभाग होता. वैशालीचे गुरु संगीततज्ज्ञ पं. मनोहर चिमोटे नागपुरातीलच असल्याने तिचे बंध या मातीशी जुळले आहे. स्वर पावसात भिजतात, ऐका दाजिबा हे तिचे संगीत अल्बम लोकप्रिय झाले आहेत. लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून तिने रसिकांना जिंकले ‘ऐका दाजिबा..’ हे गीत सादर करीतच तिने रंगमंचावर प्रवेश केला आणि त्यानंतर एकापेक्षा एक सरस गीते सादर करून तिने रसिकांची दाद घेतली. याप्रसंगी तिने काही हिंदी आणि मराठी गीते सादर केली. ‘छलका छलका रे.., कलासिका पानी, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा.., आभास हा छळतो मला.., गोंधळाला ये..’ आदी गीते सादर करताना तिने प्रथमपासूनच कार्यक्रमावर पकड ठेवली. तिच्यासह रसिका आणि अनिरुद्ध जोशी यांनीही गीतांच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना थिरकायला भाग पाडले. निवेदन नम्रता अग्निहोत्री यांचे होते. वाद्यसंगीतात महेंद्र ढोले, परिमल जोशी, अरविंद उपाध्ये, तुषार विघ्ने, श्रीकांत खोलकुटे यांनी सुयोग्य साथसंगत केली. शेफ विष्णू मनोहर, पोलीस अधिकारी माने, मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)