शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ३५०० कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले आहे, त्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन होत आहे. पंजाब आणि नजीकच्या सीमावर्ती हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये तथाकथित शेतकरी मोबाईल टॉवर्स बंद करण्यात मश्गूल आहेत. पेट्रोल पंप आणि स्टोर्स उघडू दिले जात नाहीए. जाणकारांच्या मते, उद्योग विरोधी पोस्टर्सचा धुमाकूळ असलेल्या या आंदोलनाचा फटका केवळ मोबाईल कंपन्यांनाच होत आहे असे नाही तर यामुळे उद्योगधंदेही डबघाईला आले आहेत. एसोचैमच्या आकलनानुसार शेतकरी आंदोलनाने उद्योग धंद्यांना दररोज ३५०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे.

मोबाईल टॉवर बंद केल्याने ऑनलाईन व्यवसायाशी निगडित नागरिकांचे भविष्य अंधकारात गेले आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसही बंद पडले आहेत. कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमचा विचारही डब्बाबंद पडला आहे. विशेषज्ञांच्या मतानुसार आंदोलनाची आग आता पंजाबच्या अंतर्गत भागातही पोहोचलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसोबतच पंजाबचा प्रसिद्ध होजियरी उद्योगही आंदोलनामुळे डबघाईला आला आहे. एवढेच नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनाही येणाऱ्या काही दिवसांत विद्युत संकटाचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा का असेना, त्यांचे प्रयत्न पंजाबमध्ये गुंतवणूक आणण्याचे असतात. परंतु, दुर्दैवाने आंदोलनाच्या काळात सर्वच पक्षांचे नेते गप्प बसले आहेत. व्होट बँकेसाठी पंजाबमध्ये उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणारे पंजाबचे नुकसान करणार असल्याचे मत पंजाबचे हितचिंतक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील औद्योगिकीकरण नष्ट करून ते पंजाबसोबतच शेतकऱ्यांचेही नुकसानच करणार आहेत. बंगालमध्येही उद्योगधंद्यांना अशाच तऱ्हेने विरोध केला गेला आणि आज ते राज्य आर्थिक विवंचनेत राहिले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचा उपयोग केवळ राजकीय शस्त्र म्हणून केला जात असल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन पं. बंगालमधील सिंगुल जमीन विवादाचे स्मरण करून देत आहे. त्या आंदोलनाचे भोग संपूर्ण बंगालला भोगावे लागले होते आणि टाटाचा नॅनो प्लांट गुजरातमध्ये शिफ्ट करण्यात आला होता. त्याचा फटका सिंगुलमधील शेतकऱ्यांना बसला आणि आज ते अत्यंत बिकट परिस्थितीत जगत आहेत. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावर येताच टाटा कंपनीला बंगालमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आमंत्रित केले होते. पंजाबने प. बंगालकडून शिकवण घेणे गरजेचे आहे.

.........