शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

दादासाहेबांनी सेवेचा महासेतू उभारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:21 IST

दादासाहेबांनी जोपासलेल्या ऋणानुबंधामुळे अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले.

ठळक मुद्दे वेदप्रकाश मिश्रा : विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दादासाहेबांनी जोपासलेल्या ऋणानुबंधामुळे अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले. त्यांनी अनेक गरजूंसाठी शिक्षणाची दारे मोकळी करून अनेकांचे जीवन प्रकाशमान करून सेवेचा महासेतू उभारला, असे गौरवोद्गार क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या परमाणू शास्त्र विभागाचे प्रमुख पी. डब्ल्यू. देशकर, काँग्रेसचे नेते अनंतराव घारड, दादासाहेब काळमेघ स्मृती महाविद्यालयाचे संस्थापक शरद काळमेघ, आमदार प्रकाश गजभिये, दंत महाविद्यालयाचे राजेंद्र सिंग, माजी कुलसचिव सुभाष बेलसरे उपस्थित होते.डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, दादासाहेबांमध्ये असलेल्या असामान्य निडरतेमुळे त्यांच्यात त्वरित निर्णय घेण्याची क्षमता होती. त्यामुळे अनेकजण घडले. त्यांच्यात सामाजिक कटिबद्धता होती. त्यांच्या काळात विद्यापीठावर विद्यार्थ्यांचे मोर्चे यायचे. परंतु तेंव्हा विद्यार्थी नेते सलोख्याने बोलणी करून हसतमुखाने परत जात. आताच्या सारखे त्यावेळी बाऊन्सर वापरण्याची प्रथा विद्यापीठात नसल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.प्राचार्य देवेंद्र बुरघाटे म्हणाले, गरिबीची जाणीव असल्यामुळे दादासाहेबांनी अनेक गरजूंना मदत केली. जीवनात त्यांनी मूल्याला महत्त्व देऊन वाटचाल केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश गजभिये म्हणाले, फुले, शाहू महाराजांचा वारसा दादासाहेब काळमेघ यांनी समर्थपणे सुरू ठेवून तो विद्यापीठात राबविला. त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने बहुजनांचे राज्य निर्माण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयाचे शरद काळमेघ यांनी प्रास्ताविकातून दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा दिला.यावेळी माधव गावंडे यांनी दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भजन सादर केले. कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.