शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सिलिंडर "698

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:57 IST

महागाईने कंबरडे मोडलेल्या आणि अच्छे दिनच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य नागरिकांना सरकारने दिवाळीच्या तोंडावर धक्का दिला आहे.

ठळक मुद्देमहागाईत सिलिंडरचा भडकादीड रुपये वाढीची घोषणा फोलग्राहकांवर पडतोय ५० रुपयांचा भार

राघवेंद्र तिवारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महागाईने कंबरडे मोडलेल्या आणि अच्छे दिनच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य नागरिकांना सरकारने दिवाळीच्या तोंडावर धक्का दिला आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाल्याने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.रविवारी सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमतीत १.५० रुपये वाढविण्याची घोषणा केली होती. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. ही किंमत थेट ५० रुपयाने वाढलेली आहे. ही वाढ का झाली, याची एजन्सीला माहिती नाही. परंतु सोमवारपासून सुरू झालेल्या नवीन महिन्याच्या बिलात सरळ वाढ दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत १४.२ किलोग्रॅम गॅसच्या घरगुती सिलिंडरची किंमत ६४८ रुपये होती. सोमवारपासून ती ६९८ रुपये झाली आहे. त्याचप्रकारे १९ किलोग्रॅम गॅस असलेल्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ११७२ वरून १२४८.५० पैसे इतकी करण्यात आली आहे. यात डीलरचे कमिशन दीड रुपये वाढले आहे. हे कमिशन मागच्या महिन्यापर्यंत ४७.४० रुपये होते. ते आता प्रति सिलिंडर वाढून ४८.९० रुपये झाले आहे.रविवारी सायंकाळी घरगुती सिलिंडरच्या किमतीत दीड रुपयाची वाढ झाल्याचे ऐकताच गृहिणींनी सरकारच्या विरोधात नाराजीही व्यक्त केली होती. परंतु ज्या ग्राहकांच्या घरी सोमवारी सिलिंडर पोहोचले त्यांना अचानक ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागल्याने त्यांचा पारा तर आणखीनच वाढलेला होता.गॅस सिलिंडरच्या व्यवसायाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या ‘टॅक्सेशन’मध्येकुठलाही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये वाढ झाल्याने गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. ऐन दिवाळीच्या सणापूर्वी गॅसच्या किमती वाढवून सरकारने नागरिकांवर अतिरिक्त बोजा वाढवला आहे.सरकार नागरिकांना फसवीत आहेसरकारने पेट्रोलियम उत्पादन तयार करणाºया कंपन्यांना जनतेला लुटण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. एकीकडे कंपन्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लुटत आहेत तर दुसरीकडे सरकार याला लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सरकार नागरिकांना फसवित आहे, असा आरोप करीत अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे महासचिव देवेंद्र तिवारी यांनी केला आहे. मोदी सरकार लोकांना फसवित आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवण्यासाठी कंपन्यांना पूर्णपणे मोकळीक दिली आहे. त्यामुळेच सर्वत्र महागाई वाढत आहे.अशी झाली दरवाढ सिलिंडर पूर्वी आता१४.२ कि.ग्रा. ६४८ ६९८१९ कि.ग्रा. ११७२ १२४८.५०सप्टेंबर महिन्यात घरगुती सिलिंडरची किंमत ६४८ रुपये होती. ती आता ६९८ रुपये झाली आहे. किंमतीत ५० रुपये वाढ दिसत असली तरी सरकारने यात किती सबसिडी वाढविली हे दोन ते तीन दिवसांत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावरच सांगता येतील. यानंतरच सिलिंडरची मूळ किंमत समजेल.- उदय संगीतराव, रश्मी गॅस एंजन्सी, मानकापूरसरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरला जीएसटीअंतर्गत आणण्यात यावे. सरकारने कंपन्यांना किमतीसंदर्भात पूर्णपणे नियंत्रणमुक्त केले आहे आणि सबसिडी संपविण्याचा मागे लागले आहे. परंतु ५० रुपयाची वाढ सामान्य गरीब नागरिकांसाठी मोठा फटका आहे. आम्ही याचा विरोध करू.- गजानन पांडे , अध्यक्ष,अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ