शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिंग आरोग्यासाठी लाभदायक

By admin | Updated: September 23, 2014 01:07 IST

सायकलमुळे इंधनाची बचत होते, प्रदूषणही होत नाही शिवाय आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे, हा संदेश इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) , जनआक्रोशन, इसाफ, हॉक रायडर्स, सॅडलअप गाईज

नागपूर : सायकलमुळे इंधनाची बचत होते, प्रदूषणही होत नाही शिवाय आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे, हा संदेश इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) , जनआक्रोशन, इसाफ, हॉक रायडर्स, सॅडलअप गाईज व आॅरेंजर्सच्या वतीने देण्यात आला. जागतिक ‘कार फ्री डे’च्या निमित्ताने सोमवारी पहाटे शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए येथून झाला. यावेळी हिरवी झेंडी आयएमए मुख्यालयाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, जनआक्रोशचे ज्येष्ठ सदस्य अशोक करंदीकर, अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड व सचिव रवींद्र कासखेडीकर यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आली. रॅली आयएमए येथून निघून अलंकार टॉकीज चौक, व्हीआयपी मार्ग, बोले पेट्रोल पंप चौक, जीपीओ चौक, आकाशवाणी चौक, संविधान चौक, व्हेरायटी चौक, झासी राणी चौक, विद्यापीठ ग्रंथालय चौक ते आयएमए येथे पोहोचली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच स्वयंस्फूर्तीने शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते. दरम्यान रॅलीच्या प्रारंभप्रसंगी डॉ. अढाव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सायकलिंग हा अतिशय चांगला आणि उपयोगी व्यायामप्रकार आहे. सायकलीला पेट्रोल लागत नाही, देखभालीसाठी फार खर्चही लागत नाही आणि प्रदूषण एकदम शून्य! पण या सर्व कारणांशिवायही उत्तम कारण म्हणजे सायकलिंग आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या वसाहतीत सायकल चालवावी. यामुळे त्याचा प्रभाव दिसून येईल. डॉ. लद्धड म्हणाले, सायकलमुळे इंधनाची बचत होतेच, शिवाय प्रदूषणही होत नसले तरी आता सायकली फारशा दिसत नाही. तंदुरु स्त राहण्यासाठी प्रत्येकाने सायकल चालवायला हवी. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही सुधारेल. डॉ. देशपांडे म्हणाले, सायकल चालविण्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाठीच्या मणक्याशेजारील स्नायूची शक्ती वाढून सुधारते. हृदयाची कार्यक्षमता फुप्फुसाची श्वास घेण्याची क्षमता वाढीला लागते. मनातील ताणतणाव, चिडचिड आणि नैराश्य दूर होते. शरीरातील सर्व स्नायू कार्यरत होऊन शक्तिवान होतात. प्रास्ताविक कासखेडीकर यांनी केले. (प्रतिनिधी)