शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका; फेसबुकची मैत्री नडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 10:57 IST

Nagpur News एका कॉम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या तरुणाला कथित विदेशी महिलेसोबत फेसबुक फ्रेंडशिप करणे चांगलेच महागात पडले. तिने गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने दोन लाख पाच हजार रुपये हडपले. 

ठळक मुद्देगिफ्टच्या नावाने दोन लाख हडपले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका कॉम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या तरुणाला कथित विदेशी महिलेसोबत फेसबुक फ्रेंडशिप करणे चांगलेच महागात पडले. तिने गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने दोन लाख पाच हजार रुपये हडपले. संकल्प महेश पटले (वय ३२) असे या प्रकरणातील फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संकल्प एका काम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर आहे. त्याला १० एप्रिल २०२० ला वेणीसा स्कॉड नामक महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती एक्सेप्ट केल्यानंतर कथित वेणीसा संकल्पसोबत सलग ऑनलाइन संपर्क करू लागली. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर वेणीसाने संकल्पचा मोबाइल नंबर मिळवला आणि त्याला गिफ्ट पाठवीत असल्याची थाप मारली. हे कथित गिफ्ट एअरपोर्टवर अडवून धरले गेले. त्यासाठी कस्टम ड्युटी भरणे बंधनकारक आहे, असे कथित कस्टम ऑफिसर सुमित राणा याने संकल्पला फोन करून सांगितले. त्यानंतर आरोपी वेणीसा, सुमित राणा यांनी समीर गुहा, श्रद्धा मिश्रा आणि सुमन शहा यांच्या नावे असलेले वेगवेगळे बँक अकाउंट नंबर देऊन संकल्पला दोन लाख पाच हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. रक्कम भरल्यानंतर पुन्हा काही ना काही कारण सांगून आरोपी त्याला नव्याने बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत होते. वारंवार हा प्रकार होत असल्यामुळे संकल्पला संशय आला. त्याने आणखी रक्कम जमा करण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संकल्पने पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून सोमवारी कपिल नगर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

तपास सायबर सेलकडे

यापूर्वी असे अनेक गुन्हे घडले आहेत. दिल्ली, नोएडात बसून नायजेरियन टोळी असले गुन्हे करतात. लोकमतने त्यांच्या गुन्ह्याची वेगवेगळी पद्धत दर्शविणारी एक वृत्तमालिका यापूर्वी प्रकाशित करून नागरिकांना सतर्क करण्याचाही प्रयत्न केला आहे, हे विशेष! या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडे सोपविण्यात आला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.

---

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम