शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केले बँक खाते साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 19:49 IST

बजाजनगरातील एका व्यक्तीच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी एप्रिल ते जुलै २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत दोन लाख ७९ हजार रुपये ऑनलाईन लंपास केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बजाजनगरातील एका व्यक्तीच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी एप्रिल ते जुलै २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत दोन लाख ७९ हजार रुपये ऑनलाईन लंपास केले.पीडित व्यक्ती बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांचे बँक ऑफ इंडियाच्या व्हीएनआयटी शाखेत खाते आहे. १४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांच्या खात्यात २ लाख ८८ हजार ९२० रुपये जमा होते. ५ जूनला त्यांच्या मुलांनी ३० हजार रुपयांची खरेदी केली. २१ जुलैला पीडित व्यक्तीला बँकेकडून मेसेज आला की त्यांच्या खात्यात १५,४६३ रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ते बँकेत गेले आणि त्यांनी पासबुक अपडेट करून घेतले यावेळी त्यांना त्यांच्या खात्यात १४,१३७ रुपये जमा असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी बँक अधिकाऱ्याकडे विचारपूस केली असता सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून २ लाख ७९ हजार रुपये परस्पर काढून घेतले, असे उघड झाले. विशेष म्हणजे, पीडित व्यक्तीने कोणतीही लिंक ओपन केली नाही आणि ज्या कालावधीत सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन रक्कम लंपास केली, त्या कालावधीत बँकेकडून पीडित व्यक्तीला कोणताही मेसेज आला नाही. दरम्यान, पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँक