शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागाची आखणी की विरोधकांची कापणी?

By admin | Updated: June 6, 2016 03:00 IST

महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याचे शासकीय परिपत्रक जारी झाल्याने संभाव्य

कमलेश वानखेडे ल्ल नागपूरमहापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याचे शासकीय परिपत्रक जारी झाल्याने संभाव्य प्रभागांची रचना करण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. ही जबाबदारी पूर्णपणे प्रशसनाच्य हाती असली तरी राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपनेते प्रशासनाला अप्रत्यपक्षपणे हाताशी धरून विरोधी सदस्य अडचणीत येतील, अशी प्रभाग रचना करतील, असा धोका विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे विरोधक या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असून असे काही घडले तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.महापालिकेत चार सदस्यीय प्रभागाची आखणी करताना लोकसंख्या, भूप्रदेश, नैसर्गिक सीमा, मुख्य रस्ते आदी निकष पाळावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले दोन सलग प्रभाग जोडून एक नवा चार सदस्यीय प्रभाग तयार केला जाण्याची शक्यता कमीच आहे. दोन सलग प्रभाग जोडतानाही निकषांची पूर्ती करताना त्यात बरेच फेरबदल केले जातील. या फेरबदलात काँग्रेससह विरोधी सदस्य असलेल्या प्रभागांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून ‘गेम’ केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एखाद्या प्रभागातील एखाद्या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपाच्या उमेदवाराला एकतर्फी मते मिळाली असतील तर नेमका तेवढा भाग शेजारच्या भाजपबहुल प्रभागाशी जोडता येईल का, याची भाजपकडून चाचपणी केली जाईल व शक्य असेल तेथे तसे केलेही जाईल, अशी काँग्रेसला शंका आहे. एकदा प्रभाग रचनेचा आराखडा तयार झाला की नंतर त्यावर आक्षेप व सूचना मागविल्या जातात. मात्र, सुनावणी नंतरही त्यात फारसा काही बदल होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आतापासूनच प्रभाग रचना करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची रणनीती काँग्रेससह विरोधी पक्षांनी आखली आहे. कमी फरकाचे प्रभाग भाजपसाठीही अडचणीचेसध्याची प्रभाग रचना व विजयी झालेले नगरसेवक पाहता महापालिकेची अपेक्षित प्रभाग रचना करवून घेणे भाजपसाठी वाटते तेवढेही सोपे नाही. दोन प्रभाग एकमेकांना जोडताना काही भागात भाजपच्याही विद्यमान नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता आहे. २०० मतांहून कमी फरकाने भाजपचे काही नगरसेवक विजयी झाले आहेत. त्याच्या शेजारच्या प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बसपाने बाजी मारली आहे. त्यावेळी मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला होता. आता मात्र, प्रभागाची सीमा वाढणार असल्यामुळे तेवढे मतविभाजन होणार नाही. याचा फटका कमी मतांनी जिंकलेल्या भाजप नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या मतांवर भाजपचे गणितचार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक मतदारसंघाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीला मोठे स्वरूप येणार आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर भाजपने विजयाचे गणित आखले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता सलग दोन प्रभागातील भाजपची मते एकत्र केली तर ६० टक्के जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होऊ शकतात. विधानसभेच्या आकडेवारीने भाजपने मनोबल उंचावले असून त्यामुळे भाजप नेते निश्चिंत आहेत.