शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

५० लाख रुपये हडपण्याचा कट

By admin | Updated: June 26, 2015 02:44 IST

बनावट कागदपत्र आणि भलत्याच व्यक्तीला उभे करून चंद्रपूरच्या एका व्यक्तीला ५० लाखांचा गंडा घालण्याचा कट दोघांनी रचला.

एक लाख हडपले : बनावट कागदपत्रे, जमीनमालकही बनावट ंनागपूर : बनावट कागदपत्र आणि भलत्याच व्यक्तीला उभे करून चंद्रपूरच्या एका व्यक्तीला ५० लाखांचा गंडा घालण्याचा कट दोघांनी रचला. वेळीच ही बनवाबनवी उघड झाल्यामुळे संबंधित व्यक्तीची ४९ लाख रुपये बचावले. ५० लाख रुपये हडपण्याचा कट रचून एक लाख रुपयांचा अ‍ॅडव्हान्स घेणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव संजय रमेश शर्मा असे आहे. तो आणि त्याचा एक साथीदार पाचपावलीतील कमाल चौकाजवळ राहतात. भद्रावती(जि.चंद्रपूर)जवळच्या चिचोर्डी येथील देवराव भदुजी बदकी(वय ५९)यांचा सोनेगाव परिसरात जय बद्रीनाथ गृह निर्माण सहकारी संस्थेत(मौजा भामटी)एक भूखंड आहे. आरोपी शर्माने बनावट कागदपत्रे तयार करून तो भूखंड संदीप गौरीशंकर दिवेकर यांना ५० लाखात विकण्याचा सौदा केला. बदकी यांच्या नावाने भलताच एक इसम उभा केला. त्यानंतर शर्मा आणि त्याच्या साथीदाराने दिवेकर यांच्याकडून १० डिसेंबर २०१४ ला एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेतले. दरम्यान, बदकी यांच्या लक्षात हा गैरप्रकार आल्यामुळे त्यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी शर्मा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. ही बनवाबनवी लवकर उजेडात आल्यामुळे दिवेकर यांचे ४९ लाख रुपये वाचले. (प्रतिनिधी)नोकरीच्या नावाखाली फसवणूक नागपूर : लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या. सीताबर्डी आणि प्रतापनगरातील या घटना आहेत. सीताबर्डीतील तरुणीला दिल्लीतील ठगाने १०,५४० रुपयांचा गंडा घातला. विजेंद्र जोशी असे त्याचे नाव असून तो ३३२, विनोदनगर, दिल्ली येथे राहतो. आॅनलाईन जॉब सर्चिंग करणाऱ्या करिश्मा संजय गंगवानी (वय २३, रा. भगवाघर लेआऊट, धरमपेठ) हिला जोशीने रॅनबॅक्सी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मुलाखत आणि इतर खर्चासाठी त्याने करिश्माला २३ जूनला १०, ५४० रुपये जमा करण्यास सांगितले. त्याने सांगितल्यानुसार करिश्माने पंजाब नॅशनल बँकेच्या खाते क्र ४८३८०००१०००५३१६५ मध्ये रक्कम जमा केली. मात्र, आरोपीकडून नंतर कोणतेही मुलाखतपत्र अथवा ई-मेल आला नाही. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विजेंद्र जोशीविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)