शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची दिवाळी

By admin | Updated: April 1, 2017 02:53 IST

सुप्रीम कोर्टाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदीला व विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने

३ हजार दुचाकी तर १०० कार्सची विक्री नागपूर : सुप्रीम कोर्टाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदीला व विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने व वाहन विक्रेत्यांनी वाहनांवर मोठी सूट दिल्याने एकट्या उपराजधानीत तीन हजार दुचाकी तर १०० कार्सची हातोहात विक्री झाली. यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) २ कोटी १७ लाखांचा महसूल प्राप्त झाला. विशेष म्हणजे, बहुसंख्य वाहन विक्रेत्यांकडे असलेल्या वाहनांचा ‘स्टॉक’ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच संपला. परिणामी, अनेक ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले. मात्र, ज्यांना दुचाकीवर ५ ते १५ हजार तर चारचाकी वाहनांवर ७० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळाली त्यांनी ‘दिवाळी’सारखा आनंद साजरा केला. ‘आऊट आॅफ स्टॉक’ चे लागले फलक ‘बीएस-३’ वाहनांच्या विक्रीची ३१ मार्च ही शेवटची तारीख असल्याने दुचाकी वाहनांवर साधारण ५ ते १५ हजार तर चारचाकी वाहनांवर साधारण ७० हजार रुपयांपर्यंत सूट देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येत ग्राहक मोठ्या आशेने विविध शोरुममध्ये पोहचले. परंतु दुपारी १२ वाजत नाही तोच ‘आऊट आॅफ स्टॉक’चे फलक लागणे सुरू झाले. यामुळे ग्राहकांमध्ये निराशा पसरली. काहींनी अधिकाऱ्यांपासून ते नेत्यापर्यंतची मदत घेऊन ‘डिस्काऊंट’मध्ये वाहन मिळते का याचेही प्रयत्न केल्याचे समजते. ‘बीएस-३’ या वायूप्रदूषणविषयक मानकाची दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहनांच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली आहे. शिवाय १ एप्रिल २०१७ पासून अशा वाहनांची नोंदणीही होणार नाही. त्या ऐवजी ‘बीएस-४’ या वायूप्रदूषण मानकाची पूर्तता केलेल्या वाहनांचे उत्पादन व विक्री होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने स्थानिक वाहन (आॅटोमोबाईल) क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘बीएस-३’ वाहनांना ग्राहक मिळण्यासाठी शहरातील बहुसंख्य वाहन विक्रेत्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर ‘बंपर डिस्काऊंट’ उपलब्ध करून दिले होते. यामुळे गुरुवारपासून बहुसंख्य वाहन विक्रेत्यांचे शोरुम ग्राहकांनी फुल्ल होते. मात्र शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेकांकडील वाहनांचा ‘स्टॉक’ संपला. दोन दिवसात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये तीन हजार दुचाकी तर १०० कार्सची विक्रमी विक्री झाली.