शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘केबल’मुळे ग्राहक हतबल : ‘पॅकेज’बाबत प्रचंड संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:34 IST

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात विविध वाहिन्यांच्या ‘पॅकेज’बाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देट्रायच्या आदेशाविरोधात केबल ऑपरेटर्सची मनमानीतयार केले स्वतंत्र पॅकेजकेबल सेवा बंद होणार, ग्राहकांची लूट, पॅकेजची यादी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात विविध वाहिन्यांच्या ‘पॅकेज’बाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. शहरातील ‘केबल ऑपरेटर्स’नी तर चक्क स्वतंत्र ‘पॅकेज’ तयार केले आहेत व सोयीस्करप्रमाणे ते ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. एकप्रकारे ग्राहकांच्या संभ्रमाचा फायदाच उचलण्यात येत आहे. दुसरीकडे शहरातील बऱ्याच ‘ऑपेरटर्स’ने ‘पेड चॅनेल’चे प्रसारण बंद केले आहे. यामुळे ग्राहक व ‘केबल ऑपरेटर्स’मध्ये वाद वाढले आहेत.ग्राहकांना कोणत्या वाहिन्या पाहायच्या, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ट्रायच्या या निर्णयामुळे मिळाल्याचा दावा केला जात असला तरीही मल्टीसर्व्हिस प्रोव्हायडरने (एमएसओ) मराठी व हिंदी वाहिन्यांचे स्वतंत्र ‘पॅकेज’ तयार करून केबल ऑपरेटर्सच्या माध्यमातून ग्राहकांवर लादू लागल्यामुळे ग्राहक आणि केबल ऑपरेटर्समध्ये निरंतर वाद होत आहे. ट्रायच्या आदेशानंतरही केबल ऑपरेटर्स मनमानी करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.छुप्या शुल्कामुळे ग्राहकांना मनस्तापनागपुरात यूसीएन, जीपीटीएल, इन केबल आणि सिटी केबल असे चार एमएसओ आहेत. सर्वांनी ट्रायच्या नियमाविरुद्ध मराठी आणि हिंदी वाहिन्यांचे स्वतंत्र चॅनल तयार केले असून, ते ग्राहकांवर लादत आहेत. सर्व वाहिन्यांनी पॅकेज जाहीर केल्यानंतरही छुप्या स्वरूपात जास्त शुल्क आकारण्यात येत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास एका कंपनीचे २० वाहिन्यांचे पॅकेज ४९ रुपये असेल तर त्यावर १८ टक्के जीएसटी आणि नेट कॅपॅसिटी फीच्या नावाखाली प्रत्येक वाहिनीसाठी ८० पैसे शुल्क असे मिळून पॅकेजसाठी दरमहा ७४ रुपये आकारण्यात येत आहे. अर्थात ४९ रुपयांच्या पॅकेजवर २५ रुपये ग्राहकांना जास्त द्यावे लागत आहे. ‘ट्राय’च्या नियमाप्रमाणे एक वाहिनी निवडण्याची ग्राहकांना मुभा आहे. पण ‘एमएसओ’ने स्वतंत्र पॅकेज तयार करून ग्राहकांचा अधिकार हिरावला आहे. ‘एमएसओ’चा परवाना निलंबित करण्याची ग्राहकांची मागणी आहे.केबल सेवा बुधवारी मध्यरात्रीपासून बंद होणारशहराच्या अनेक भागातील जीपीटीएल, इन केबल आणि सिटी केबलच्या सेवा बंद झाल्या आहेत. ‘यूसीएन’ची सेवादेखील मध्यरात्रीपासून प्रभावित होण्याची शक्यता आहे.ऑपरेटर्सतर्फे ‘पॅकेज’ची यादी देण्यास टाळाटाळट्रायने केबल व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जानेवारी महिना दिला होता. फेब्रुवारी महिन्याचे सहा दिवस लोटल्यानंतरही केबल ऑपरेटर्सचा एमएसओसोबत कमिशनवरून वाद सुरू असल्यामुळे त्यांनी अनेक ग्राहकांना फ्री चॅनल आणि पेड चॅनलची यादी दिलेली नाही. शिवाय ग्राहकांना ‘पॅकेज’ न निवडल्यास केबल सेवा बंद करण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून पॅकेजचे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत आकारण्यात येत आहेत. केबल ऑपरेटर्सच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे.