शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

शेकडो नेत्रहीनांचे आयुष्य सावरणारी ‘जिज्ञासा’ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

स्वत:च्या अंधत्वावर केली मात : आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तशी ती सामान्यच होती. परंतु एका आजारामुळे ...

स्वत:च्या अंधत्वावर केली मात :

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तशी ती सामान्यच होती. परंतु एका आजारामुळे तिची दृष्टी हळूहळू जाऊ लागली. वयाच्या १८ व्या वर्षी ती कायमची अंध झाली. डोळ्यांचा प्रकाश कायमचा गेला पण आयुष्याची दृष्टी मात्र तिने गमावली नाही. नवनवीन गोष्टी शिकत गेली. यातून तिने आपल्या अंधत्वावर तर मात केलीच परंतु आपल्यासारख्याच शेकडो नेत्रहीन, अंधांचा जगण्याचा मार्ग तयार केला. अंधांना दैनंदिन जीवनात कुणाच्याही मदतीशिवाय वावरता यावे इथपासून तर त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगारासाठी ती आजही धडपडत आहे. नेत्रहीनांचे आयुष्य सावरणारी ही महिला म्हणजे जिज्ञासा चवलढाल होय.

जिज्ञासा कुबडे-चवलढाल ही सर्वसामान्य कुटुंबातील. वडील अरुण कुबडे हे शासकीय नोकरीत. आई हेमा या प्राध्यापिका.

जिज्ञाचा या नावाप्रमाणेच आहेत. नवनवीन गोष्टी शिकण्याचा त्यांना मोठा छंद. मात्र एका आजाराने त्यांना विळखा घातला. या आजारात त्यांची दृष्टी हळूहळू जात होती. तिलाही कल्पना यायला लागली होती. डॉक्टरांनीसुद्धा तिला असलेल्या आजारामुळे ती कायमची नेत्रहीन होईल, याची कल्पना आधीच दिलेली होती. तिला पूर्णपणे अंधत्व आले तेव्हा सुरुवातीला ती घाबरली. परंतु लगेच स्वत:ला सावरले. अर्थात आई-वडिलांची साथ होतीच. अंधत्व आल्यावरही तिने योगाचे प्रशिक्षण घेतले. रेकीचे म्हणजे हस्तस्पर्शाने उपचार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. आनंदवनला जाऊन ब्रेल, रेकीमध्ये मास्टरकी मिळवली. ॲक्युप्रेशर थेरेपीही शिकली. काही सामाजिक प्रकल्पातही काम केले. असे चौफेर ज्ञान मिळविल्यानंतर तिने संगणकाचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले. अडचणी प्रचंड होत्या. परंतु तिने हार मानली नाही. शिकण्याची जिद्द सोडली नाही. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?‘जॉ एक्सेस वीद स्पीच’ या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ती संगणक शिकली. त्यानंतर बंगलुरु येथे जाऊन तिने खास अंधांसाठीचे एमएससीआयटीचे प्रशिक्षण घेतले. इतक्यावरच ती थांबली नाही. तर आपल्यासारख्याच नेत्रहीनांनाही स्वत:च्या पायावर उभे करण्याचा तिने संकल्प केला. यासाठी आत्मदीपम सोसायटी नावाची संस्था स्थापन करून अंधांना संगणक प्रशिक्षण देण्याचे ठरले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा, एमएससीआयटीचेही प्रशिक्षण देऊन लागली. इतकेच नव्हे तर अंध व त्यांच्या कुटुंबाच्याच मदतीसाठी स्वंयरोजगाराचाही प्रयत्न केला. यात अगरबत्ती उद्योगापासून तर पेपरप्लेट, फुलवाती बनवण्याचे गृहोउद्योग उभारला. या गृहउद्योगातून अनेकजण आपल्या पायावर उभे आहेत. आतापर्यंत शेकडो अंधांना तिने आपल्या पायावर उभे केले आहे. यात जिज्ञासाला तिच्या कुटुंबासह पती योगेश्वर चवलढाल यांचीही मोलाची साथ लाभली, हे विशेष.

बॉक्स

आत्महत्येसाठी निघालेला तरुण स्वरोजगार करतोय

सुरुवातीला काही अंध तिच्याकडे संगणक शिकायला यायचे. यातून अनेकांना रोजगारही मिळाला. असाच एक १९-२० वर्षांचा अंध तरुण तिच्याकडे संगणक शिकायला आला. त्याच्या आईनेच त्याला आणले. अंधत्वामुळे निराश झालेला हा तरुण आत्महत्या करण्याचा विचारात होता. जिज्ञासाने अगोदर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला. आपणही सर्वसामान्यांमध्ये सर्वकाही करू शकतो, ही भावना त्याच्यात निर्माण झाली. आज तो तरुण स्वयंरोजगार करतोय.

बॉक्स

क्रिकेट अन् म्युझिकल ग्रुपही

आत्मदीपम सोसायटीच्या माध्यमातून जिज्ञासा ज्यांना म्युझिकची आवड आहे. त्यांना संगीतही शिकवते. अंधांचा आत्मदीपम म्युझिकल ग्रुपही तिने तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. तसेच विविध क्रीडा प्रकार शिकवले जातात. विशेषत: क्रिकटेची तर एक टीमच तयार केली आहे. अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत तिच्या विदर्भाच्या चमूने आतापर्यंत दोन वेळा स्टेट चॅम्पियनशिप जिंकली आहे.