शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

‘सीएसआयआर’ची भरती प्रक्रिया केंद्रीकृत करणार

By admin | Updated: August 19, 2016 02:46 IST

भारत सरकारच्या वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या (सीएसआयआर) अखत्यारीतील ...

सतीश वटे यांचे प्रतिपादन : वनराई फाऊंडेशनतर्फे भावपूर्ण सत्कार नागपूर : भारत सरकारच्या वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या (सीएसआयआर) अखत्यारीतील ३८ प्रयोगशाळांचे कामकाज प्रभावी होण्यासाठी त्यात ‘टॅलेंट’ असलेल्या वैज्ञानिकांची भरती करणे गरजेचे आहे. त्यासाठी २०१८ पर्यंत ‘सीएसआयआर’ची भरती प्रक्रिया केंद्रीकृत करणार असल्याचे प्रतिपादन नीरीचे माजी संचालक आणि ‘सीएसआयआर’च्या भरती व मूल्यांकन बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे यांनी केले. नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सीएसआयआर’या संस्थेच्या भरती व मूल्यांकन बोर्डाच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती केली. या नियुक्तीबद्दल वनराई फाऊंडेशनच्यावतीने शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलातील शंकरराव देव संवाद कक्षात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे अतिरिक्त महासंचालक आर. के. चौबे, विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, अध्यक्ष अनंत घारड, सचिव अजय पाटील, कार्यकारी अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या हस्ते डॉ. सतीश वटे आणि माधवी वटे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वटे म्हणाले, नीरीचा संचालक झाल्यानंतर वनराईनेच माझा पहिला सत्कार केला होता. ‘सीएसआयआर’ सारख्या संस्थेचा अध्यक्ष होणे ही मोठी जबाबदारी आहे. कुटुंबाच्या सहकार्याशिवाय कोणतेही यश मिळविणे अशक्य होते. योग्य व्यक्तीने योग्य काम केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळत असल्यामुळे ‘सीएसआयआर’च्या भरतीत नवे टॅलेंट आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आर. के. चौबे म्हणाले, पर्यावरणाच्या क्षेत्रात डॉ. सतीश वटे यांचे कार्य मोलाचे आहे. भविष्यात नवी जबाबदारीही ते सक्षमपणे पार पाडतील. डॉ. वटे यांची नियुक्ती ‘सीएसआयआर’सारख्या संस्थेवर झाल्यामुळे हा नागपूरचा गौरव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आमदार गिरीश व्यास यांनी डॉ. वटे यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून नागपूरकरांना एकेक संधी उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. गिरीश गांधी यांनी डॉ. सतीश वटे यांनी विद्यार्थी जीवनापासून नागपूरची प्रतिष्ठा वाढविली असून स्वत: पंतप्रधानांनी त्यांची नियुक्ती केल्यामुळे ही नागपूरसाठी गौरवाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. नितीन जतकर यांनी डॉ. सतीश वटे यांचा परिचय करून दिला. संचालन अजय पाटील यांनी केले. आभार प्रशांत वासाडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)