शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

खुरसणे, मोनिका अव्वल

By admin | Updated: October 26, 2015 02:57 IST

रविवारी सकाळच्या सुमारास दीक्षाभूमीचे रस्ते पुन्हा एकदा गर्दीने फुलले होते. ही गर्दी बघितल्यानंतर ‘ना उम्र की सीमा हो ना जन्मो का हो बंधन’ या ओळींची आठवण झाली.

प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि लोकमत यांचा संयुक्त उपक्रम : नागपूर १०-के स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : रविवारी सकाळच्या सुमारास दीक्षाभूमीचे रस्ते पुन्हा एकदा गर्दीने फुलले होते. ही गर्दी बघितल्यानंतर ‘ना उम्र की सीमा हो ना जन्मो का हो बंधन’ या ओळींची आठवण झाली. निमित्त होते प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०-के या शर्यतीचे. या शर्यतीत अपेक्षेप्रमाणे नागपूरचे स्टार अ‍ॅथ्लिट नागराज खुरसणे आणि मोनिका राऊत यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात बाजी मारली. नागपूर जिल्हा हौशी अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेच्या सहकार्याने आयोजित या शर्यतीत जवळजवळ अडीच हजार धावपटूंनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पुरुष विभागात १० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत मध्य रेल्वेचा धावपटू नागराज खुरसणेने ३१.२५ मिनिट वेळेसह अव्वल स्थान पटकावले. एसआरपीएफचा धावपटू सचिन घोरोटे (३२.०२ मिनिट) याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा शुभम मेश्राम तिसऱ्या स्थानाचा मानकरी ठरला. नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे आकाश उके आणि नीलेश जांगडे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिले. प्रदीप कुयमर व महेश वाढई यांना प्रोत्साहनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महिला विभागात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची धावपटू मोनिक राऊतने बाजी मारली. तिने ३४.४६ मिनिटात शर्यत पूर्ण केली. ज्योती चव्हाण (३६.४९ मिनिट) आणि राजश्री पद्मगिरवार (नव महाराष्ट्र) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. रश्मी गुरनुले चौथ्या तर शीतल बारई पाचव्या स्थानाच्या मानकरी ठरल्या. पुरुष विभागात पाच किलोमीटर अंतराच्या शर्यतीत प्रफुल्ल जगतोडे (१६.२० मिनिट, इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्ट््स अकादमी), संतोष यादव (१६.२२ मिनिट, इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी) आणि जसवीर सिंग (१६.२९ मिनिट, इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्ट््स अकादमी) अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानाचे मानकरी ठरले.महिला विभागात निकिता राऊत (१९ मिनिट, ट्रॅक स्टार), स्नेहा बोरकर (१९.५० मिनिट, एनडीएसी क्लब) आणि सारिका वासनिक (२०.०५ मिनिट, महाराष्ट्र विद्यालय) यांनी अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर बाजी मारली. त्याआधी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरसेवक संदीप जोशी आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. चे संचालक (परिचालन) अशोक जैन, सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांनी विविध गटातील शर्यतींना झेंडी दाखवली. समारोपानंतर आयोजित पुरस्कार वितरण समारंभात प्लॅटिनाचे चेअरमन डॉ. प्रमोद मुंदडा, डॉ. रश्मी मुंदडा, धवल अंतापुरे, कुसुमताई बोदड फाऊंडेशनच्या आरती बोदड यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी लोकमतचे उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, प्रो हेल्थ फाऊंडेशनचे डॉ.अमित समर्थ आणि रितू जैन, नागपूर जिल्हा अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)निकालपुरुष (१० किलोमीटर) :- १) नागराज खुरसणे (मध्य रेल्वे, ३१.२५ मिनिट). २) सचिन घोरोटे (एसआरपीएफ, ३२.०२ मिनिट). ३) शुभम मेश्राम (नव महाराष्ट्र, ३२.३५ मिनिट). ४) आकाश उके (नव महाराष्ट्र, ३३.६ मिनिट). ५) नीतेश जगनाडे (नव महाराष्ट्र, ३४.२० मिनिट). प्रोत्साहनार्थ पुरस्कार : प्रदीप कुमार (हैदराबाद), महेश वाढई (चंद्रपूर). महिला (१० किलोमीटर) :- १) मोनिक राऊत (दपूम रेल्वे) ३४.४६ मिनिट. २) ज्योती चव्हाण (आॅरेंज सिटी स्पोटर्््स अकादमी) ३६.४९ मिनिट. ३) राजश्री पद्मगीरवार (नव महाराष्ट्र) ३९.३४ मिनिट. ४) रश्मी गुरनुले (आॅरेंज सिटी स्पोटर्््स अकादमी) ४०.१८ मिनिट. ५) शीतल बारई (ट्रॅक स्टार) ४२.२० मिनिट).पुरुष (५ किलोमीटर) :- १) प्रफुल्ल जगतोडे (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १६.२० मिनिट). २) संतोष यादव (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १६.२२ मिनिट). ३) जसवीर सिंग (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १६.२९ मिनिट). ४) प्रवीण झमाठे (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १६.३८ मिनिट). ५) शुभम मारबते (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स, १६.४७ मिनिट). महिला (५ किलोमीटर) :-१) निकिता राऊत (ट्रॅक स्टार, १९ मिनिट). २) स्नेहा बोरकर (एनडीएसी क्लब, १९.५०). ३) सारिका वासनिक (महाराष्ट्र विद्यालय, २०.०५ मिनिट). ४) यामिनी ठाकरे (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, २०.२७ मिनिट). ५) निकिता भुम्बरे(आॅरेंज सिटी स्पोटर्््स क्लब, २३ मिनिट).पुरुष (३ किलोमीटर) :- १) अजित भेेंडे (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १४.३० मिनिट). २) नंदू रमेश (नव महाराष्ट्र, १५.०७ मिनिट). ३) राष्ट्रपाल भोयर (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १५.२० मिनिट). ४) मयूर मेश्राम (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १५.४७ मिनिट). ५) संदेश शेंबे (नव महाराष्ट्र, १६.०२ मिनिट). महिला (३ किलोमीटर) :- १) अमृता अडेलवार (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, १४.५७ मिनिट). २) रितिका अडेलवार (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, १५ मिनिट). ३) श्रृती बहाणे (ट्रॅक स्टार, १५.०३ मिनिट). ४) निधी तराटे (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, १५.१५ मिनिट). ५) विद्या लोही (इन्स्टिट्यूट आॅफ स्पोटर्््स अकादमी, १५.४८ मिनिट).पुरुष ५ किलोमीटर (३५ वर्षांवरील) :-१) घनश्याम पद्मगीरवार. २) विलास राऊत. ३) मुकेश ढोबळे. ४) विलास देवगडे. ५) सुधाकर ठाकरे.महिला ३५ वर्षांवरील (५ किलोमीटर) :- १) वीणा सरदारे. २) प्रिया सदावर्ते. ३) मनिषा बापटकर. ४) रेवती बहाले. ५) सुनैना सराफ.पुरुष १० किलोमीटर (३५ वर्षांवरील) :- १) नागोराव भोयर. २) केशव.महिला १० किलोमीटर (३५ वर्षांवरील) :- शारदा भोयर. २) कुलवंत खुराणा. ३) झुमकी मार्डीकर. ४) माधुरी निमजे.