शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यात होतेय खचाखच गर्दी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा ...

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रद्द केलेल्या रेल्वेगाड्या रुळावर आणणे सुरू केले आहे. प्रमुख रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. तर उत्तर भारताकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यात मात्र प्रवासी खचाखच भरलेले दिसत असून कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र दिसत आहे. हे वातावरण कोरोनासाठी पोषक असल्याचे मत रेल्वेतील जाणकार व्यक्त करीत आहेत.

मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊन लावल्यानंतर देशाच्या विविध भागात राहणाऱ्या कामगारांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे ते आपापल्या मूळ गावी निघुन गेले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा पहिल्या लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा कामगारांना आपल्या गावाकडे निघून जावे लागले. परंतु आता पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही याची खात्री पटल्यामुळे कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी परत जात आहेत. उत्तर भारत, बंगाल आणि छत्तीसगड येथून मोठ्या संख्येने कामगार पुन्हा दक्षिण भारताकडे परत जात आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात या कामगारांची गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अनारक्षित तिकीट बंद केले आहेत. प्रवासासाठी कन्फर्म तिकीट असणे गरजेचे आहे. जनरल कोचमध्ये प्रवास करण्यासाठीही आरक्षण करणे गरजेचे आहे. परंतु बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालकडून येत असलेल्या रेल्वेगाड्यांकडे पाहून कोरोना कधीच नव्हता असे वाटत आहे. दानापूर, गोरखपुर, पटना आणि लखनौकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील जनरल कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र आहे. १०२ सीट असलेल्या जनरल कोचमध्ये १५० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. दुसरीकडे नागपूरवरून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. काही गाड्यात वेटिंग ५० आणि १०० पर्यंत पोहोचले आहे. पुन्हा सुरु झालेल्या मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु शनिवारी आणि रविवारी पुन्हा दुरांतोच्या स्लिपर क्लासमध्ये वेटिंग सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यात होणारी खचाखच गर्दी थांबविण्याची गरज आहे.

...................