शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळपेठेत देहव्यापार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:03 IST

परिसरात नॅचरोपॅथीच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सूत्रधारासह तिघांना अटक केली.

सूत्रधारासह तिघांना अटक : नॅचरोपॅथीत हा कोणता उपचार ? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : परिसरात नॅचरोपॅथीच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सूत्रधारासह तिघांना अटक केली. लोकमतने १७ जुलैला ‘पोलिसांच्या आश्रयात देहव्यापार ’या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. चार महिन्यापासून अंबाझरी ठाण्याच्या परिसरात गोकुळपेठच्या भास्कर अपार्टमेंटमध्ये केअर नॅचरोपॅथी क्लिनिक सुरू झाले होते. यात देहव्यापार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना होती. परंतु पोलिसांनी त्याकडे गंभीरतेने घेतले नाही. लोकमतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाची कानउघाडणी केली. वरिष्ठांच्या कानउघाडणीने सतर्क झालेल्या पथकाने मंगळवारी बनावट ग्राहक क्लिनिकमध्ये पाठविला. त्याच्याकडून सिग्नल मिळताच पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांना क्लिनिकची सूत्रधार मीनाक्षी ऊर्फ मीना पंढरी खारकर (२९) चंदननगर, प्रीती निखिल शर्मा गांधीबाग व मोहसिन खान सना खान (२८) रा. छावणी मशीद तेथे सापडल्या. पोलिसांकडून कारवाई होत असल्याचे लक्षात येताच मीनाने कारवाईपासून बचाव करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु पोलिसांनी तिचे प्रयत्न अयशस्वी ठरविले. सूत्रांच्या मते, शहरातील बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांना या अड्ड्याची माहिती होती. त्यांनी एसीबीला कारवाईचे निर्देशही दिले होते. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची हिंमत दाखविली नाही. परंतु लोकमतच्या वृत्ताने खळबळ उडाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मीनाने एका बिल्डरकडून फ्लॅट किरायाने घेतला होता. या प्रकाराची बिल्डरलाही माहिती होती. त्यामुळे बिल्डरचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. सूत्राच्या माहितीनुसार एसीबीकडून होत नसलेल्या कारवाईत जॉन नावाच्या दलालाची महत्त्वाची भूमिका आहे. दलालाच्या माध्यमातून आर्थिक पुरवठा होत होता. ही कारवाई उपायुक्त श्वेता खेळकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक शुभदा शंके यांच्या पथकाने केली.