शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेत कोट्यवधींच्या व्याजाचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 11:11 IST

नागपूर महापालिकेने र्बॅक आॅफ महाराष्ट्रकडून ३१ मार्च २०१० ला २०० कोटींचे कर्ज घेतले होते. कर्जावरील व्याजाची वसुली ९.५० व १० टक्के दराने करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसला आहे.

ठळक मुद्दे२०० कोटींचे कर्ज व्याजदर ८.५० वरून केला ९.५० टक्केसदस्यांची चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत नागपूर शहरात वाढीव पाणीपुरवठा योजना पेंच -१ व पेंच -४ टप्पा व अन्य प्रकल्पांचा आर्थिक वाटा उचलण्यासाठी महापालिकेने र्बॅक आॅफ महाराष्ट्र यांच्याकडून ३१ मार्च २०१० ला २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाचा व्याजाचा दर ८.५० टक्के ठरला होता. याबाबत महापालिका व बँक व्यवस्थापन यांच्यात करार करण्यात आला होता. मात्र कर्जावरील व्याजाची वसुली ९.५० व १० टक्के दराने करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसला आहे. या आर्थिक घोळाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. महापालिकेने आजवर २१२ कोटी ९६ लाख १५ हजार ३५२ रुपयांंची परतफेड केली आहे. अजूनही महापालिकेकडे ३३ कोटी ७३ लाख ३ हजार ४८४ रुपयांचे कर्ज शिल्लक आहे. व्याजासहीत ही रक्कम ५० कोटीवर जाणार आहे. म्हणजे महापालिकेला ६२ कोटीहून अधिक रक्कम व्याजापोटी द्यावी लागणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी याबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. परंतु गोंधळामुळे यावर चर्चा झाली नव्हती. करारच्या तुलनेत व्याजदर एक टक्का वाढविण्यात आल्याने महापालिकेला कोट्यवधीचा फटका बसला आहे. लेखापरीक्षकांनी यावर आक्षेप नोंदविला असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संदीप सहारे यांनी महापौर व आयुक्तांकडे केली आहे.लेखापरीक्षकांचा आक्षेपलेखापरीक्षकांनी २०१७ च्या लेखापरीक्षणात यावर आक्षेप नोंदविला आहे. कराराच्या तुलनेत अधिक व्याज देण्यात आल्याने महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संदीप सहारे यांनी केली आहे.सभागृहात चर्चा टळलीमहापालिके च्या सर्वसाधारण सभेत गेल्या महिन्यात याबाबतचा प्रश्न सहारे यांनी चर्चेसाठी दिला होता. अजेंड्यावर हा विषय घेण्यात आला होता. परंतु बसपा नगरसेवकांनी गोधळ घातल्याचे कारण पुढे करून महापौरांनी सभा गुंडाळल्याने या विषयावरील चर्चा टळली. परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात महापालिकेने आजवर व्याजापोटी २१२ कोटी ९६ लाख १५ हजार ३५२ रुपयांची परतफेड केल्याची माहिती दिली आहे. व्याजदराची चौकशी झाल्यास यात अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.