शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापन देशासमोरील गंभीर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:32 IST

देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे,

ठळक मुद्देतेज पी.सिंह : ‘नीरी’त ‘ईटीबीडब्ल्यूसी’वर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे, असे मत ‘एम्स’चे प्रा.तेज पी.सिंह यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर’चा अमृत महोत्सव व ‘सीएसआयआर-नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून ‘बीआरएसआय’च्या (द बायोटेक रिसर्च सोयायटी आॅफ इंडिया) सहकार्याने ‘ईटीबीडब्ल्यूसी’ (इमर्जिन्ग ट्रेन्ड्स इन बायोटेक्नॉलॉजी फॉर वेस्ट कन्व्हर्जन) आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते रविवारी बोलत होते.८ ते १० आॅक्टोबर या कालावधीत आयोजित या परिषदेचे उद्घाटन ‘नीरी’च्या सभागृहात झाले. यावेळी मोहाली येथील ‘सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग’चे वैज्ञानिक प्रा.अशोक पांडे, ब्लैस पास्कल विद्यापीठाच्या रसायन आणि जीवरसायन अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. क्लॉड गिल्स डुसॅप, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.घनकचरा व्यवस्थापनावर तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर प्रकाश टाकण्यात येईल. जीवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सामाजिक कल्याणाची बरीच मोठी क्षमता आहे. मात्र या क्षेत्रात भारत अद्यापही मागेच आहे. ‘डाटाबेस’ विकसित करण्यात देशाने फारसे योगदान दिलेले नाही, याकडे प्रा.सिंह यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी ‘स्ट्रक्चरल बेसिस आॅफ अ‍ॅन्टिबॅक्टेरियल अ‍ॅक्शन आॅफ इन्नेट इम्यून प्रोटिन्स अ‍ॅन्ड देअर अप्लिकेशन्स अ‍ॅज प्रोटीन अ‍ॅन्टीबायोटिक’ या विषयावर बीजभाषण केले. ‘बीआरआयएस’कडून समाजहितासंदर्भात संशोधन करण्यावर भर देण्यात येईल व एकत्रित प्रयत्नांतून नक्कीच सकारात्मक परिणाम समोर येतील, असा विश्वास प्रा.पांडे यांनी व्यक्त केला. डॉ.राकेश कुमार यांनी ‘नीरी’ने पर्यावरणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानांची माहिती दिली. कचºयाचे ऊर्जा किंवा इतर स्वरूपात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेमुळे देशात रोजगाराच्यादेखील संधी वाढतील, असे प्रतिपादन डॉ.कुमार यांनी केले.प्रा.क्लॉड गिल्स डुसॅप यांच्या हस्ते ‘बीआरएसआय’ची वार्षिक पुस्तिका व परिषदेच्या ‘ई-प्रोसिडिंग्ज’चे विमोचन करण्यात आले. ‘बीआरएसआय’ पुरस्कारांचेदेखील यावेळी वितरण करण्यात आले. डॉ. सुनील कुमार यांनी परिषदेबाबत माहिती दिली. परिषदेदरम्यान तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कचरा पुनर्प्रक्रियेतील जागतिक विकास, कचºयापासून जैवइंधन व जैविक उत्पादने, नॅनोटेक्नोलॉजीचा उपयोग इत्यादी मुद्यांवर देशविदेशातील वैज्ञानिक, अभियंते व तज्ज्ञ भाष्य करणार आहेत.