शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

विदर्भातील जंगल पर्यटनाची क्रेझ वाढली

By admin | Updated: August 29, 2016 02:44 IST

मागील काही वर्षांत पर्यटकांमध्ये विदर्भातील जंगल पर्यटनाची प्रचंड क्रेझ वाढली आहे. यामुळेच गत पाच वर्षांत जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

जंगल सफारी : वर्षभरात १ लाख १३ हजार पर्यटक नागपूर : मागील काही वर्षांत पर्यटकांमध्ये विदर्भातील जंगल पर्यटनाची प्रचंड क्रेझ वाढली आहे. यामुळेच गत पाच वर्षांत जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वन विभागाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार मागील २०१३-१४ या वर्षांत विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, टीपेश्वर अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला व मानसिंगदेव अभयारण्यात ७४ हजार ५११ पर्यटकांनी जंगल सफारी केली. तसेच २०१४-१५ मध्ये ही संख्या ७३ हजार ६६७ होती तर २०१५-१६ मध्ये यात अचानक प्रचंड वाढ होऊन ती संख्या १ लाख १३ हजार ९३२ वर पोहोचल्याचे दिसून येत आहे. शिवाय यातून पेंच व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशनला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे. जाणकारांच्या मते, मागील काही वर्षांत सामान्य नागरिकांमध्ये जंगल आणि वन्यप्राण्यांविषयी आकर्षण वाढले आहे. त्याचा फायदा विदर्भातील जंगल पर्यटनाला होत आहे. विदर्भातील जंगल पर्यटनासाठी देश-विदेशातील पर्यटक येऊलागले आहे. मात्र त्याचवेळी वन विभाग या पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. आजही पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, मानसिंगदेव आणि उमरेड-कऱ्हांडला येथे अनेक सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो. उमरेड-कऱ्हांडला आणि मानसिंगदेव अभयारण्यात अजूनपर्यंत साधी निवासाची सुद्धा व्यवस्था नाही. एकिकडे वन विभागाला या जंगल पर्यटनातून कोट्यवधीचा महसूल मिळत असताना सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशाने मात्र पर्यटकांच्या आवडी-निवडी व गरजा लक्षात घेऊन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामुळे विदर्भातील पर्यटक मध्य प्रदेशाकडे वळत आहेत. या पर्यटकांना विदर्भात थांबविण्याची आज गरज निर्माण झाली आहे. परंतु वन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यात कमी पडत आहे. (प्रतिनिधी)‘एमटीडीसी’ ठरले पांढरा हत्तीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) नागपुरातील विभागीय कार्यालयाने विदर्भातील आपले सर्व रिसोर्ट आणि हॉटेल्स भाडेपट्टीवर खासगी ठेकेदारांच्या हाती दिले आहेत. शिवाय स्वत: केवळ ‘रिसेप्शनिस्ट’ ची भूमिका पार पाडत आहे. वास्तविक या कार्यालयाकडून विदर्भातील पर्यटन विकासासंबंधी अनेक अपेक्षा आहेत. मात्र मागील काही वर्षांत हा विभाग केवळ पांढरा हत्ती बनला आहे. या विभागाकडून विदर्भातील पर्यटन विकासासाठी कोणतेही प्रयत्न झालेले दिसून येत नाही. यामुळे नागपुरातील एमटीडीसीच्या विभागीय कार्यालयाला नेहमीच टीकेचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, येथील काही अधिकाऱ्यांनी या कार्यालयाला स्वत:ची मक्तेदारी समजली आहे. अशाच काही घटनांमुळे मागील तीन वर्षांपूर्वी हा विभाग बदनाम झाला होता. या विभागातील एका अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केले होते. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुद्धा करण्यात आली होती.