शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्या गोरक्षकांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:58 IST

भारसिंगी येथील गोवंश मांस प्रकरणात सलीम ईस्माईल शहा यास मारहाणप्रकरणी अटकेतील चार आरोपींना नरखेड येथील न्यायालयात सोमवारी हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.

सलीम शहाला जामीन मंजूर : भारसिंगी येथील गोवंश मांस प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : भारसिंगी येथील गोवंश मांस प्रकरणात सलीम ईस्माईल शहा यास मारहाणप्रकरणी अटकेतील चार आरोपींना नरखेड येथील न्यायालयात सोमवारी हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चौघांचीही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तसेच गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सलीम शहाला न्यायालयाने जामीन मंजूर केला. सलीम ईस्माईल शहा (३२, रा. हत्तीखाना, काटोल) याच्याकडे गोवंश मांस आढळून आल्याने कथित गोरक्षकांनी त्याला जबर मारहाण केली होती. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भारसिंगी येथे बुधवारी (दि. १२) सकाळी घडली होती. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी मोरेश्वर तांदूळकर (३०, रा. भारसिंगी, ता. नरखेड), जगदीश चौधरी (२८, रा. मदना, ता. नरखेड), अश्विन उईके (२६, रा. नारसिंगी, ता. नरखेड) व रामेश्वर तायवाडे (२७, रा. जामगाव, ता. नरखेड) या चौघांना अटक केली होती. त्यांना गुरुवारी काटोल येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चारही आरोपींना सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नरेंद्र पुरी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद ऐकून घेत चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चौघांचीही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. दुसरीकडे, गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी सलीम शहा यास शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्याला रविवारी नरखेड येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यालाही सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नरेंद्र पुरी यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयात पोलिसांच्यावतीने अ‍ॅड. जी. बी. राऊत यांनी तर सलीमच्यावतीने अ‍ॅड. संजय क्षीरसागर यांनी बाजू मांडली.सलीमला भारसिंगीत मज्जावसलीम शहा याने भारसिंगी येथे जाऊ नये तसेच त्याने कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगू नये, या अटींवर नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नरेंद्र पुरी यांच्या न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. सलीमला जामीन मंजूर होऊनही परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी त्याला काही काळ ताब्यात ठेवले होते. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्याला त्याच्या घरी सोडले. आरोपींना न्यायालयात आणतेवेळी तसेच नेतेवेळी पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.पोलीस उपअधीक्षक (गृह) गावंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे न्यायालयात हजर होते. या घटनेच्या माहितीबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली होती.