शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदारांवर आठ दिवसात गुन्हे

By admin | Updated: November 6, 2016 02:09 IST

मतदार यादींमध्ये बोगस मतदारांची नावे आल्याने अशा बोगस मतदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,

काँग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासननागपूर : मतदार यादींमध्ये बोगस मतदारांची नावे आल्याने अशा बोगस मतदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेसने शहरअध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करीत कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना बोगस मतदार आणि मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या आठ दिवसात गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले. हिलटॉप प्रभागात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने बोगस मतदारांची नोंदणी केली जात आहे. यासंदर्भातील पुराव्यानिशी निवेदन काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात १७ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तेव्हा महिनाभरात कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. दीड महिना लोटूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी ३ वाजता काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. मुख्य गेट बंद करण्यात आले होते. कार्यकर्ते नारेबाजी करीत गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे थोडा वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, तानाजी वनवे, सेवादल प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, प्रशांत धवड, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अ‍ॅड. संदेश सिंगलकर, विजय बाभरे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, देवा उसरे, संजय सरायकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाशी चर्चा करतांना जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला. आंदोलनात रत्नाकर जयपूरकर, जयंत लुटे, हरीश खंडाईत, किशोर गीद, रजेश कडू, वीणा बेलगे, संजय चौधरी, उमेश शाहू, अशोक यावले, दीपक वानखेडे, प्रशांत कापसे, प्रशांत डाकने, वैभव काळे, नगरसेविका सरस्वती सलामे, रेखा बाराहाते, पुष्पा निमजे, भावना लोणारे, हाजी मो. कलाम, राजश्री पन्नासे, सुजाता कोंबाडे, पद्मा उईके, प्रेरणा कापसे, निमिशा शिर्के, पंकज निघोट, पंकज थोरात, घनशाम मांगे, निर्मला बोरकर, दिनेश तराळे, सुनील चोपडा, इरशाद मलिक, सुकेश निमजे, सुनील दहीकर, किशोर जिचकार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)