शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर भूमी अभिलेख उपअधीक्षक जाळ्यात

By admin | Updated: May 25, 2016 02:53 IST

वडिलोपार्जित शेतीची वाटणी करून मोजणी करण्यासाठी आधी ७००० रुपये घेऊनही मोजणी करून न देणाऱ्या भिवापूर येथील ...

‘एसीबी’ची कारवाई : ७०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेभिवापूर : वडिलोपार्जित शेतीची वाटणी करून मोजणी करण्यासाठी आधी ७००० रुपये घेऊनही मोजणी करून न देणाऱ्या भिवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी उपअधीक्षकास ७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई भिवापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.सुनील नीळकंठ श्रीखंडे (३८) असे अटक करण्यात आलेल्या प्रभारी उपअधीक्षकाचे नाव आहे. फिर्यादी नंदकिशोर वसंतराव देवतळे, रा. लोणारा, ता. भिवापूर यांची लोणारा शिवारात १७ एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीची भावांमध्ये वाटणी करावयची असल्याने त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात या शेताच्या मोजणीसाठी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी अर्ज केला. सदर मोजणीसाठी प्रभारी उपअधीक्षक सुनील श्रीखंडे याने त्यांना ७००० रुपयांची मागणी केली. सदर रक्कम मिळाल्यानंतर श्रीखंडे याने १६ फेब्रुवारीला मोजणीबाबत नोटीस काढला व २१ एप्रिल ही मोजणीची तारीख ठरविण्यात आली. ठरलेल्या दिवशी देवतळे कुटुंबीय शेतात हजर होते. मोजणी करण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे देवतळे यांनी २ मे रोजी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावर श्रीखंडे याने त्यांना पुन्हा २००० रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतरही श्रीखंडे त्रास देत असल्याने देवतळे यांनी २० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. ठरल्याप्रमाणे एसीबीचे पथक मंगळवारी दुपारी भिवापुरात दाखल झाले. सायंकाळच्या सुमारास दोन पंचासमक्ष देवतळे यांनी श्रीखंडे याला त्याच्या कक्षात ७०० रुपये दिले. त्यातच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, भानुदास गीते, प्रभाकर बल्की, मिश्रा यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)१३ हजार ५३० रुपये आढळलेसुनील श्रीखंडे याने अनेकांकडून पैसे वसून करीत मोठी माया जमविल्याची माहिती जाणकारांनी दिली. कारवाईदरम्यान, पथकातील सदस्यांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५०० रुपयांच्या २५ नोटा, १०० रुपयांच्या ९ नोटा, ५० रुपयांच्या २ नोटा, १० रुपयांच्या ३ नोटा असे एकूण १३ हजार ५३० रूपये आढळले. पथकाने ही रक्कम लिफाफ्यात बंद करून पुरावा म्हणून ताब्यात घेतली.