शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे वार्ता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

नागपूर : काही आरोपींनी जुन्या शत्रुत्वातून हल्ला करून एका विद्यार्थिनीसह तिघांना जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ च्या ...

नागपूर : काही आरोपींनी जुन्या शत्रुत्वातून हल्ला करून एका विद्यार्थिनीसह तिघांना जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अंबाझरीतील हिलटॉप परिसरात घडली.

पोलीस तक्रारीनुसार, रिदम श्याम काळे (१७) ही मित्र शिवांग तिवारी, श्रावणी मडावी व सौम्या अय्यर यांच्यासोबत हिलटॉप परिसरातील फुटपाथवर बसली होती. दरम्यान, आरोपी निखिल रेड्डी हा सात-आठ साथीदारांसोबत तेथे पोहोचला. त्यांनी जुन्या शत्रुत्वातून रिदमला काठीने मारहाण केली. शिवांग व श्रावणी रिदमला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

---------------

शांतीनगरात अ‍ॅक्टिव्हा पेटवली

नागपूर : काही अज्ञात आरोपींनी शांतीनगर येथे एक अ‍ॅक्टिव्हा दुचाकी पेटवली. ही घटना शनिवारी रात्री घडली. झाडे चौक येथील फिर्यादी सूरज विठोबा बर्डीकर यांनी घरापुढे अ‍ॅक्टिव्हा उभी केली होती. दरम्यान, अज्ञात आरोपींनी अ‍ॅक्टिव्हाला आग लावली. शांतीनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

--------------

दारुड्या पतीचा पत्नीवर हल्ला

नागपूर : एमआयडीसी येथील दारुड्या पतीने पत्नीला काठीने जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास घडली.

विनोद सिरसाट (४९) असे आरोपीचे नाव असून तो रमाबाई आंबेडकरनगर येथील रहिवासी आहे. पत्नीचे नाव मीना आहे. विनोद दारू पिऊन घरी आला. त्याने मीनाला भोजन वाढायला सांगितले. त्यानंतर तो मीनाला शिवीगाळ करायला लागला, तसेच त्याने मीनाला मारहाण केली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

-------------

भोजनासाठी मित्रावर प्राणघातक हल्ला

नागपूर : भोजन तयार केले नाही म्हणून एका युवकाने मित्रावर काठीने प्राणघातक हल्ला केला.

संतोष ऊर्फ मायकल यादव (३५) असे आरोपीचे, तर चक्रधर घाटे (३५) असे जखमीचे नाव आहे. दोघेही डिप्टी सिग्नल परिसरात एकत्र राहतात. ते भोजनाचा खर्च अर्धा-अर्धा वाटून घेतात; परंतु संतोषने पैसे न दिल्यामुळे चक्रधरने भोजन तयार केले नाही. त्यामुळे संतोष संतापला. त्याने शुक्रवारी रात्री चक्रधरला काठीने मारहाण केली व फरार झाला. आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.