शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

चित्रांश टेक्नॉलॉजी संचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: March 24, 2015 02:21 IST

हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या चित्रांश टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालकांसह सदर

सहपोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई नागपूर : हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या चित्रांश टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालकांसह सदर पोलिसांनी पाच जणांवर अखेर गुन्हा दाखल केला. गुंतवणूकदारांना एक टीव्ही द्यायचा. टीव्हीवर विविध जाहिराती दाखविण्याच्या बदल्यात पहिल्या सहा महिन्यात प्रति महिना सात हजार रुपये, त्यानंतरच्या सहा महिन्यात दर महिन्याला आठ हजार आणि २४ महिन्यांपर्यंत १० हजार रुपये देण्याचा गुंतवणूकदारांसोबत करार करायचा आणि त्याच्याकडून प्रारंभी ३५ हजार रुपये घ्यायचे, अशी चित्रांशच्या संचालकांची कार्यपद्धत होती. त्याला उपराजधानीतील हजारो गुंतवणूकदार फशी पडले. त्यांनी चित्रांशच्या संचालकांना ३५ हजार रुपये दिले. पहिल्या दोन महिन्यात चेकने रक्कम दिल्यानंतर तिसऱ्या महिन्यातच अनेकांचे चेक बाऊन्स झाले. त्यामुळे संबंधितांनी चित्रांशच्या श्रीराम टॉवर, सदरमधील कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी पीडितांना वेगवेगळे कारण सांगून शांत करण्यात आले. मात्र रक्कम मिळण्याऐवजी केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचे पाहून २०० वर गुंतवणूकदारांनी १६ मार्चला कार्यालयात ‘हल्लाबोल‘ केला. सदर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही. परिणामी हवालदिल पीडितांनी परिमंडळ २ च्या उपायुक्तांकडे धाव घेतली. त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी ५० वर पीडितांनी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांची भेट घेऊन चित्रांशचे एमडी सुधींद्रमोहन माथूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. सदर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ५.२० वाजता चित्रांशचा सर्वेसर्वा एस. एम. माथूर, कंपनीचा महाव्यस्थापक, टीव्ही वितरक, एजंट तसेच योगेश आणि अमित नामक तरुणासह पाच जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)