शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक

By admin | Updated: June 30, 2017 02:31 IST

विविध शासकीय कार्यालयात दलालंकडून बनावट मुद्रांक तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध शासकीय कार्यालयात दलालंकडून बनावट मुद्रांक तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ ठिकाणी ‘सर्जिकल स्ट्राईक; केले. पोलिसांच्या कारवाईमुळे दलाल आणि एजंटमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. काहींनी स्वत:ला वाचविण्यासाठी आपापल्या बॅग, लॅपटॉप जागीच सोडून पळ काढला. मात्र, अनेक ठिकाणी पोलिसांनी महत्त्वाच्या कागदपत्र आणि साहित्यासह दलालांना ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश, सहायक आयुक्त शिवाजीराव बोडखे यांना या संबंधाने नियमित तक्रारी मिळत आहेत. त्यामुळे दलालांच्या विळख्यात सापडलेल्या विविध शासकीय कार्यालयात धडक कारवाई करण्याची योजना दोन दिवसांपूर्वी तयार करण्यात आली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात ‘अ‍ॅक्शन प्लान‘ तयार करण्यात आला. ठरल्याप्रमाणे कारवाईसाठी १० वेगवेगळी पथके तयार करून विविध शासकीय कार्यालयात आज एकसाथ दलालांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू कार्यालयातून ३ एजंट, आरटीओ (गिरीपेठ) कार्यालयातून १७, ग्रामीण (लाल गोदाम) ११, कळमना कार्यालयातून ११, प्रशासकीय इमारत क्र. १ मधील भूमि अभिलेख कार्यालयातून १२, नासुप्र कार्यालय ३, सह-उपनिबंधक कार्यालय (शहर-२) सक्करदरा ३ आणि तहसील कार्यालय (शहर) मधून ३ असे एकूण ६३ एजंट दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले.महापालिकेच्या संपत्ती कर तसेच जन्म मृत्यू विभाग पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, या कार्यालयातील दलालांना कारवाईचे संकेत मिळताच त्यांनी आज या परिसरातून दूर राहणेच पसंत केले. ताब्यात घेतलेल्या ज्या दलालांकडे संशयास्पद कागदपत्रे आढळली, त्यांची तपासणी करून काहींना चौकशीसाठी पुन्हा हजर होण्याची सूचना करून सोडून देण्यात आले. महापालिकेच्या संपत्ती कर तसेच जन्म मृत्यू विभाग पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, या कार्यालयातील दलालांना कारवाईचे संकेत मिळताच त्यांनी आज या परिसरातून दूर राहणेच पसंत केले.