शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याने घेतले जीव

By admin | Updated: September 5, 2016 02:14 IST

शासकीय कामांमधील निष्काळजीपणा हा नवीन नाही. परंतु या निष्काळजीपणामुळे सामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागतो.

कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा : वर्षभरापासून १५ फूट खोल खड्डा बुजवलाच नाहीसुनील चरपे नागपूरशासकीय कामांमधील निष्काळजीपणा हा नवीन नाही. परंतु या निष्काळजीपणामुळे सामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागतो. एखाद्यावेळी जीवही गमवावा लागतो. असाच प्रकार हिंगणा तालुक्यातील सावंगी (देवळी) येथे घडला. येथील बंधाऱ्यासाठी नाल्याच्या पात्रात कंत्राटदाराने जेसीबीच्या मदतीने १५ फूट खोल खड्डा खोदला आणि त्यातील पाण्याचा वापर बांधकामासाठी केला. बंधाऱ्याचे बांधकाम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले. तरीही कंत्राटदाराने हा खड्डा बुजविला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. हा खड्डा सावंगीवासीयांसाठी जीवघेणा ठरला. या खड्ड्यात चार तरुणी, एक मुलगी आणि एक महिला अशा सहा जणींचा बुडून मृत्यू झाला.सावंगी (देवळी) शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर २०१५ मध्ये बंधारा बांधण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या बंधारा दुरुस्ती व खोलीकरण योजनेंतर्गत चार लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या कामाचे कंत्राट सावरकर नामक कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्याने सदर बंधाऱ्याचे काम मार्च ते मे २०१५ या काळात पूर्ण केले. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी लागणारे पाणी बाहेरून आणण्याऐवजी कंत्राटदाराने नाल्याच्या पात्रात जेसीबीच्या मदतीने अंदाजे १५ फूट खोल खड्डा खोदला. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा खड्डा बुजविणे क्रमप्राप्त होते. परंतु, कंत्राटदाराने हा खड्डा बुजविला नाही. लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले.या खड्ड्यात पाणी साठून राहात असल्याने मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी खड्ड्यावर इलेक्ट्रिक मोटरपंप बसवून त्यातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला होता.नागरिकांचा संताप नागपूर : बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आल्याने हा खड्डा पाण्याखाली आला होता. हा खड्डा बंधाऱ्याच्या टोकावर असल्याने गावातील तरुणींना याबाबत फारशी माहिती नव्हती. त्या आंघोळ करण्याच्या निमित्ताने बंधाऱ्यात उतरल्या आणि खोल खड्ड्याने त्यांचे प्राण घेतले. जि.प.च्या लघुसिंचन विभागांतर्गत या बंधाऱ्याचे काम झाले. सहा जणांचा बळी गेला. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जि.प. अध्यक्षांसह अनेक जणांनी भेटी दिल्या परंतु लघुसिंचन विभागातील अधिकारी मात्र आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यांनी पोलिसांना मृतदेह घेऊन जाण्यासही रोखले. (प्रतिनिधी)कंत्राटदार व अभियंत्यावर गुन्हा दाखल कराही घटना संबंधित कंत्राटदार आणि जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे घडली. या घटनेची माहिती लघुसिंचन विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली असतानाही या विभागातील अधिकारी तर सोडा कर्मचारीदेखील घटनास्थळावर आले नाही. या घटनेला कंत्राटदार व लघुसिंचन विभागाचे अभियंता सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.कुंदा राऊत,माजी अध्यक्षा, युवक काँग्रेस, रामटेक लोकसभा.