शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मानवतावादी दृष्टिकोनातून विधायक उपक्रम राबवा

By admin | Updated: May 28, 2016 03:03 IST

रक्तदान शिबिर, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधनसामुग्रीचे वाटप अशा विधायक कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकतेची बीजे रोवली जातात.

देवेंद्र फडणवीस : रक्तदान व दिव्यांग मोजमाप शिबिर नागपूर : रक्तदान शिबिर, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधनसामुग्रीचे वाटप अशा विधायक कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकतेची बीजे रोवली जातात. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोनातून समाजात विधायक उपक्रम राबवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.लकडगंज येथील पाटीदार समाज भवन येथे शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त जीवन सुरक्षा सप्ताह (रक्तदान शिबिर), दिव्यांग मोजमाप शिबिर तसेच महाराजस्व अभियानांतर्गत होणारे कार्य नागरिकांना सुलभतेने करता यावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार कृष्णा खोपडे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, संपर्क प्रमुख प्रा.प्रमोद पेंडके, नगरसेवक महेंद्र राऊत, पाटीदार समाजाचे अध्यक्ष हरीभाऊ साकला, संयोजक संजय अवचट, योगेंद्र शाहू उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त १ ते २७ मे या कालावधीत पूर्व नागपूरमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये एकूण ४ हजार ५०० लोकांनी रक्तदान केले. तसेच दिव्यांग बांधवांना आवश्यक असणाऱ्या शारीरिक अवयवांसाठी येथे मोजमाप करण्यात आले. यासाठी ६०० दिव्यांगाची नोंदणी झाली होती. मागणीप्रमाणे जयपूर येथून दिव्यांगासाठी अवयव बोलवून त्यांना वाटप करण्यात येईल. यावेळी दिव्यांगाना ई-रिक्षा, झेरॉक्स मशीन, ट्रायसिकल आदी रोजगार साहित्याचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. तसेच महाराजस्व अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व सुविधेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. संचालन महेंद्र राऊत यांनी केले. (वा. प्र.)