शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवठ्यावर धोरण तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 19:32 IST

राज्यातील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासू नये, त्यांना मागणीनुसार कोळसा पुरवठा व्हावा, कोळशाची गुणवत्ता चांगली राखली जावी, कोळसा वाहतुकीसाठी पुरेशा रेल्वेरॅक्स उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाजनको, वेकोलि व रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तपणे विचारविनिमय करून दोन महिन्यांत प्रभावी धोरण तयार करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : महाजनको, वेकोलि, रेल्वेला दोन महिन्याचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासू नये, त्यांना मागणीनुसार कोळसा पुरवठा व्हावा, कोळशाची गुणवत्ता चांगली राखली जावी, कोळसा वाहतुकीसाठी पुरेशा रेल्वेरॅक्स उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाजनको, वेकोलि व रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तपणे विचारविनिमय करून दोन महिन्यांत प्रभावी धोरण तयार करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.गेल्या उन्हाळ्यात भारनियमन करण्याची वेळ येऊ नये याकरिता महाजनको, वेकोलि व रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशावरून संयुक्त बैठक घेतली होती. औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना मागणीनुसार कोळसा पुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. परंतु, हा मुद्दा केवळ उन्हाळ्यापुरता मर्यादित नसल्याची बाब लक्षात घेता न्यायालयाने यावर सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा आदेश दिला.वेकोलि गुणवत्ताहीन कोळसा देते म्हणून महाजनको कंपनी परदेशांतून कोळसा आयात करीत होती. गुणवत्ताहीन कोळशामुळे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांतील यंत्रे खराब होतात असा कंपनीचा दावा होता. यासंदर्भात सुमारे १० याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. काही याचिकांमध्ये कोळसा आयातीला विरोध करण्यात आला आहे, काही याचिकांमध्ये वीज निर्मिती प्रकल्पांना दर्जेदार कोळसा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे तर, काही याचिकांमध्ये कोळशाच्या तुटवड्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने वेळोवेळी आवश्यक ते आदेश दिले. त्यामुळे विस्कटलेली परिस्थिती बºयाच प्रमाणात मार्गावर आली आहे. महाजनकोने गेल्या वर्षभरात कोळसा आयात केलेला नाही. तसेच, वेकोलिने कोळशाचा पुरवठा व गुणवत्तेत सुधारणा केली आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरण