शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘चिल्ड वॉटर’ व्यावसायिकांसाठी नवीन कायदा तयार करा

By admin | Updated: May 14, 2017 02:19 IST

शासनाने ‘चिल्ड वॉटर’चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायदा तयार करावा आणि कायदा तयार होईपर्यंत

असोसिएशनची मागणी : संविधान चौकात केले आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाने ‘चिल्ड वॉटर’चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायदा तयार करावा आणि कायदा तयार होईपर्यंत व्यावसायिकांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी ‘आर. ओ. चिल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर वेलफेअर असोसिएशन नागपूर’च्या वतीने करण्यात आली. विविध जिल्ह्यातून आलेल्या व्यावसायिकांनी आपल्या मागण्यांसाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून मागील काही दिवसात ‘चिल्ड वॉटर’ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. आर.ओ.च्या वतीने बँक, आॅफिस, शॉपींग मॉल, बाजार, कंपनीत शुद्ध आणि थंड पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. येथे पाणी उपलब्ध न झाल्यास थंड पाण्यासाठी फ्रीजची व्यवस्था करावी लागते. मध्यमवर्गीय कुटुंबांना पाण्याची बॉटल खरेदी करणे शक्य नसून २० लिटर पाणी आर.ओ.तर्फे केवळ ३० ते ४० रुपयात उपलब्ध करून देण्यात येते. परंतु अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत असून व्यावसायिकांसाठी कायदा तयार करण्याची मागणी ‘आर. ओ. चिल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर वेलफेअर असोसिएशन नागपूर’च्या वतीने करण्यात आली. नागपूर शहर, नागपूर जिल्हा, वर्धा, काटोल, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली येथून आलेल्या व्यावसायिकांनी संविधान चौकात जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. आंदोलनात विमल अग्रवाल, राजकुमार पांडे, नितीन कुंभारे, प्रशांत दहिकर, राहुल गुल्हाने, मनीष बरगट, मृणाली मोहता, आनंद कळंबे यांच्यासह व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.