शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नेल्सन हॉस्पिटलचे कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:07 IST

नागपूर : आज संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुस‍ऱ्या लाटेशी झुंज देत आहे. दररोज लाखो पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत ...

नागपूर : आज संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुस‍ऱ्या लाटेशी झुंज देत आहे. दररोज लाखो पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत आणि हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. आपले शहर देशातील सर्वाधिक नुकसान झालेल्या शहरांमध्ये आहे. रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन पुरवठा किंवा औषधांच्या उपलब्धतेबाबत वैद्यकीय सुविधा गंभीर तणावाखाली आल्या आहेत. या सर्व अनागोंदीदरम्यान नेल्सन हॉस्पिटलने आपल्या शहरातील बेडची कमतरता दूर करण्यासाठी आणि सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ मेपासून हॉटेल प्राईड, वर्धा रोड येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कोविड केअर सेंटरला मंजुरी देण्यात आली आहे. या सेंटरमध्ये एकूण १२७ खाटांसह ९७ खोल्या राहणार आहेत. डॉक्टरांच्या मते, जर रोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान आणि उपचार केला गेला तर तीव्रता किंवा मृत्यूचे प्रमाण नियंत्रित केले जाऊ शकते. या सेंटरमध्ये एचआरसीटी १० पेक्षा कमी आणि एसपीओ २ (ऑक्सिजन सॅच्युरेशन) ९० पेक्षा जास्त सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना सेवा मिळणार आहे. या सेंटरमध्ये डॉक्टरांची २४ तास उपलब्धता, समर्पित कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, आवश्यक औषधे, न्यूट्रिशनिस्टद्वारे नियोजित आहार, फिजिओथेरपी व रुग्णांचे समुपदेशन, आदी सुविधा राहणार आहेत. या सेंटरचे उद्घाटन १ मे रोजी दुपारी १२ वाजता मुख्य पाहुणे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका आभासी सोहळ्याच्या माध्यमातून होणार आहे. विशेष अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर टीम ल्यूक कौटिन्हो (भारतातील सेलिब्रिटी हेल्थ गुरू)कडून ‘कोविड काळात आरोग्य आणि निरोगीपणा’ या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण नेल्सन मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या फेसबुक पेजवर केले जाईल. लोकांना नेल्सन हॉस्पिटलच्या वेबसाईटवर फॉर्म भरून चौकशी करता येणार आहे. (वा.प्र.)