शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोविड-१९ चे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 20:33 IST

कोविड-१९ चे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी फिरणाऱ्यां महापालिका कर्मचाऱ्यांना दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात घडली.

ठळक मुद्देतहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ चे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी फिरणाऱ्यां महापालिका कर्मचाऱ्यांना दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात घडली. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महापालिकेचे कर्मचारी सत्येंद्र चंदनखेडे (४२) आपल्या सहकाऱ्यांसह भानखेडा परिसरात बुधवारी सकाळी ९.३० वाजता कोविड-१९ चे सर्वेक्षण करीत होते. या भागात राहणाऱ्या अब्दुल रफिक याच्या घरी चंदनखेडे आणि त्यांचे सहकारी गेले. त्यांनी सर्वेक्षण सुरू केले असता आरोपी रफिक आणि शफी या दोघांनी चंदनखेडे व त्यांचे सहकारी यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्यावर आरोप लावून त्यांना मारहाणही केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. चंदनखेडे यांनी महापालिकेच्या वरिष्ठांना ही घटना कळविली. त्यानंतर तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी अब्दुल रफिक आणि मोहम्मद शफी या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी रफिकला अटक करण्यात आली असून शफी मात्र फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.