शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

आॅनलाईन ठकबाजाला न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:21 IST

‘नोकरी डॉट कॉम ’ वर नोकरीविषयक माहिती लोड करून नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाला १७ लाख ६८ हजार ६४३ रुपयांनी गंडा घालणाऱ्या  उत्तर प्रदेशच्या एका आॅनलाईन ठकबाजाचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

ठळक मुद्देजामीन नाकारलाहिंगण्यातील तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून १७.६८ लाखांनी गंडा‘नोकरी डॉट कॉम’ चा असाही दुरुपयोग

अॉनलाईन लोकमतनागपूर : ‘नोकरी डॉट कॉम ’ वर नोकरीविषयक माहिती लोड करून नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाला १७ लाख ६८ हजार ६४३ रुपयांनी गंडा घालणाऱ्या  उत्तर प्रदेशच्या एका आॅनलाईन ठकबाजाचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.विक्कीसिंग नारायणसिंग (२०), असे या ठकबाजाचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या गाजीयाबाद येथील रहिवासी आहे.हिंगणा पोलिसांनी नवी दिल्ली येथे जाऊन ५ आॅक्टोबर २०१७ रोजी विक्की सिंग, त्याचा साथीदार शुभमराज संजय पांडे (२०) रा. गौतम बुद्धनगर यांना अटक करून ट्रान्झिट रिमांडवर नागपुरात आणले होते. या ठकबाजांचा आणखी एक साथीदार अंकित सुबोध गुप्ता रा. नोएडा हा पोलिसांना ‘मोस्ट वॉन्टेड’ आहे. परंतु तो फरार आहे.या त्रिकुटांनी हिंगणा गुमगाव येथील आशिष लक्ष्मण गांजुडे (२४) याची अवाढव्य रकमेने १५ एप्रिल २०१७ ते ५ आॅगस्ट २०१७ या काळात फसवणूक केली.पोलिसांच्या माहितीनुसार या ठकबाजांची कोणतीही स्वत:ची कंपनी नसताना त्यांनी केवळ विविध कंपन्यांच्या नावांचा उल्लेख करून केवळ तोतयागिरी केली. त्यांनी नोकरी डॉट कॉम नावाच्या वेबसाईटवर नोकरीविषयक माहिती लोड केली होती. आशिषला नोकरीची गरज असल्याने त्याने प्रतिसाद दिला होता. लागलीच या त्रिकुटांनी त्याला आपल्या जाळ्यात अडकवणे सुरू केले होते. आकर्षक नोकरीचे आमिष दाखवीत या ठकबाजांनी त्याच्याशी वेळोवेळी संपर्क साधून त्याला उदयवीर, हरिषकुमार, मनोज गुप्ता यांच्या स्टेट बँकेतील खात्यात, अमरसिंग याच्या पंजाब नॅशनल बँक आणि युको बँकेतील खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार आशिष हा पैसे जमा करीत गेला होता. त्याने आरोपींच्या वेगवेगळ्या पेटीएम अकाऊंटमध्येही पैसे जमा केले होते.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने हिंगणा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. त्यावरून २६ सप्टेंबर रोजी हिंगणा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४१९, ४२०, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क),(ड) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून या त्रिकुटाचा शोध लावला. परंतु दोघेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांचा पोलीस कोठडी रिमांड घेतला. परंतु त्यांना रक्कम जप्त करता आली नाही.पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल, टेलिफोन, लॅपटॉप, इतर दस्तावेज जप्त केले आहे. दोन्ही आरोपी नागपूर कारागृहात आहे. त्यापैकी विक्कीसिंग याने जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मुकुंद कमलाकर यांनी बाजू मांडली. पोलीस निरीक्षक ए. एस. सुगांवकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.