शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सौर ऊर्जेतूनच देश स्वयंपूर्ण

By admin | Updated: February 2, 2015 01:10 IST

खनिज संपत्ती, सौरऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचा उपयोग योग्य तऱ्हेने केला तर अनेक ऊर्जास्रोत आपल्या देशात उपलब्ध आहेत. या स्रोतांवर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्माण केली

अमर्यादित ऊर्जेतून प्रगती विषयावर परिसंवाद : मान्यवरांचा सूर नागपूर : खनिज संपत्ती, सौरऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचा उपयोग योग्य तऱ्हेने केला तर अनेक ऊर्जास्रोत आपल्या देशात उपलब्ध आहेत. या स्रोतांवर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्माण केली तर आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरजच नाही. पण या पारंपरिक ऊर्जेकडे आपले अद्यापही लक्ष गेले नाही. नैसर्गिक स्रोतांची आपण उपेक्षाच केली, त्यामुळे एकीकडे आपण मंगळावर पोहोचलो असलो तरी, ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कमी पडलो. निसर्गातून मिळणाऱ्या ऊर्जेचा अभ्यास न केला गेल्याने यासंदर्भात मोठे संशोधन उभे राहण्याची गरज आहे. प्रामुख्याने सौरऊर्जेचा उपयोग आपण विविध कारणांसाठी करू शकतो, कारण प्रत्येक उद्योगाला लागणारी वीज यातूनच निर्माण होते. हे पारंपरिक स्रोतच आपल्या देशाला स्वयंपूर्ण करू शकतात. यासाठी सौरऊर्जेचा उपयोग, उपकरणांची निर्मिती, त्यांचा आकार याबाबत नव्या संशोधकांना आणि उद्योजकांना भरपूर संधी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)ंथर्मल पॉवरचे दुष्परिणाम मोठे आहेत. सौरऊर्जेने ते पूर्ण संपतील. पण सौरऊर्जेची उपकरणे संशोधनातून आकाराने लहान करून ही ऊर्जा स्टोअर करून ठेवण्याची सोय करावी लागेल. सौरऊर्जेच्या उपयोगातून सोसायटी, शेतकरी, अपार्टमेंट यांना वीज विकून व्यवसाय उभारणी करता येते, असे मत उमेंद्र वाटोळकर यांनी व्यक्त केले. ंग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक होतो. रोज २० सिगारेट ओढल्याने होणारा परिणाम चुलीच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होतो. या धुरापासून वाचण्यासाठी मी सोलर कुकर तयार केला. त्याचा लाभ होतो आहे. गरजा ओळखून संशोधन आणि व्यवसाय करा, यश मिळेलच, असे आयआयटी पवईचे विवेक काब्रा म्हणाले. ं सेवा क्षेत्रात अनेक संधी आहेत, पण आपण त्या ओळखत नाहीत. इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे दुरुस्त करणे, बिल भरण्याची सेवा यातून मोठा उद्योग उभा राहतो, त्याची उदाहरणे आहेत. गरज ओळखा, सेवा द्या, व्यवसाय उभा होतो, असे मत निरंजन देशकर यांनी व्यक्त केले. ंआपल्याला जे आवडते त्यात झोकून द्या. त्यासाठी जिद्द ठेवा, जरा डोळसपणे आजूबाजूला पाहा. व्यवसायात यश येते, असे मत अतुल मार्डीकर यांनी व्यक्त केले.