शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

देशाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज : श्री शुभमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:43 IST

देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देसर्वोदय आश्रमात महात्मा गांधी व भारतीय राष्ट्रीयता यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य एवढेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिप्रेत नव्हते, तर या देशात सर्वधर्मसमभाव, सर्वधर्मियात प्रेम व बंधूभाव अभिप्रेत होता. दुर्दैवाने आज देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादाच्या नावावर असत्य लोकांपुढे मांडले जात आहे. सत्य बोलण्याची हिंमत राहिलेली नाही. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले. सर्वोदय आश्रम येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी व भारतीय राष्ट्रीयता या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर सर्वोदय आश्रमच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पांढरीपांडे, विश्वस्त अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी उपस्थित होते.श्री शुभमूर्ती म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे बोलण्याची आज कुणाचीही हिंमत नाही. लोकांना सत्य मांडण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. संकुचित व चुकीचा राष्ट्रवाद मांडतात आणि लोक त्यावर टाळ्या वाजवतात. देशात धर्मांधता वाढत आहे. हिंदू धर्मात सर्वधर्मसमभावाची शिकवण आहे. परंतु हिंदुत्वाच्या नावावर जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे. ही कशी लोकशाही असा सवाल त्यांनी केला.लीलाताई चितळे म्हणाल्या, महात्मा गांधी यांच्या विचाराकडे बघण्यासाठी व्यापक दृष्टिकोन लागतो. सध्या जो राष्ट्रवाद शिकवला जात आहे तो खरा राष्ट्रवाद नाही. सत्यासाठी अहिंसक कृतीतून मानवी शक्तीचा आविष्कार होत नाही तोपर्यंत खरा मानवतावाद निर्माण होणार नाही. मानवी शक्ती जागृत करण्यासाठी आज अहिंसक क्र ांतीची देशाला गरज आहे. यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन चितळे यांनी केले.सूत्रसंचालन संदेश सिंगलकर यांनी तर आभार अ‍ॅड.वंदन गडकरी यांनी मानले. यावेळी विशाखा बागडे, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, योगेश देवतळे, शेफाली शहा, यामिनी, राजेश कुंभारे, श्वेता वाघमारे यांच्यासह सर्वोदय आश्रमचे पदाधिकारी व गांधीवादी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर