शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

देशाला गांधी विचारधारेची गरज

By admin | Updated: October 3, 2015 02:46 IST

देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे.

जागतिक अहिंसा दिन : शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजननागपूर : देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे. अशा प्रसंगी समाजाला व देशाला एकजूट करणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारांची खूप गरज आहे. गांधी विचारधाराच या देशामध्ये शांती, अहिंसा, बंधुभाव कायम ठेवू शकते, असे प्रतिपादन जागतिक अहिंसा दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी येथे केले. जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेरायटी चौक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले ‘महात्मा गांधी यांना कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तरी त्यांचे योगदान कुणीच नाकारू शकणार नाही. ‘तसेच माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. सुनील केदार, माजी मंत्री आ. राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्षा सुनीता गावंडे, महिला अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके यांनीही आपले विचार व्यक्त करीत महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. सुरुवातीला संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गजराज हटेवार यांनी संचालन केले. यावेळी नाना गावंडे, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, प्रफुल्ल गुडधे पाटील, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, अभिजित वंजारी, संदीप सहारे, एस.क्यू. जमा, विजय बाभरे, डॉ. बंडोपंत टेंभुर्णे, अतुल कोटेचा, संजय दुबे, रत्नाकर जयपूरकर, उमेश शाहू, तुफेल अशर, अजय हिवरकर, संदेश सिंगलकर, घनश्याम मांगे, प्रशांत धवड, जयंत लुटे, हर्षला साबळे, अरुण डवरे, दीपक वानखेडे, तनवीर अहमद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनीही महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)विष पसरवणारी विचारसरणी हद्दपार करा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नाथुराम गोडसेची विचारप्रणाली सध्या देशात वाढली आहे. ही विचारप्रणाली देशाला विभाजित करणारी आणि समाजात विष पसरवणारी असून या विचारप्रणालीला हद्दपार करा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.