शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कापूस खरेदी वीस दिवसात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:35 IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे१५ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस पणन महासंघ व पीसीआयमार्फत कापसाची खरेदी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड-१९ नंतर ३९ हजार ३५२ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ५०४ शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अद्याप २५ हजार ६४८ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. कापूस खरेदी करताना नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले असून व्यापारी अथवा बाहेरुन येणाऱ्या राज्यातील कापूस खरेदी करण्यात येऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. रविवार वगळता इतर सुटीच्या दिवशी कापूस खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.कापूस खरेदीसाठी १५ जिनिंग व प्रेसिंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ग्रेडर कृषी विभागामार्फत नियुक्त करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित कापूस खरेदीसाठी आणताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :cottonकापूस