शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कॉ़ पानसरेंचा झंझावात आजही वैदर्भीयांच्या स्मरणात

By admin | Updated: February 22, 2015 02:29 IST

अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी

कॉ़ बाळ अलोणी अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी चळवळीशी निगडीत असलेल्या सर्व संस्था, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता़ आज त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व आठवणी एकामागून एक माझ्या डोळयासमोरून तरळत आहेत़ माझी व पानसरेंची ओळख १९७४ साली पक्षाच्या पहिल्या राज्य परिषदेत सोलापुरात झाली़ त्यावेळी शिवाजी महाराजांबद्दल होणाऱ्या चर्चेत शिवाजी आमचा की तुमचा, असा वाद होत होता़ तेव्हा कॉ़ पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले़ त्याच्या सुमारे एक लक्ष प्रती विकल्या गेल्या़या प्रक्रियेत मीसुद्धा सहभागी होतो़ आम्ही याच विषयावर धनवटे रंगमंदिरात एक व्याख्यानमाला आयोजित केली़ कॉ़ भाई बर्धन अध्यक्ष होते़ या व्याख्यानमालेला आम्ही केवळ दोन रुपये तिकीट ठेवले होते़ मला आजही लख्ख आठवतेय धनवटे रंगमंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती़ नागपुरातील जवळ-जवळ सर्वच वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रसिद्धी दिली होती़ १९९९ साली अमरावती येथे झालेल्या पक्षाच्या राज्य परिषदेत कॉ़ पानसरेंचा महत्त्वाचा वाटा होता़